शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

भक्तीचा मळा फुलला !

By admin | Updated: July 29, 2014 01:20 IST

पहिला श्रावणी सोमवार : योगसमाधीस फुलांची सजावट

सोलापूर : श्रावण मासातील आज पहिला सोमवार. भल्या पहाटेपासून ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांचे पाय घराबाहेर पडले. दर्शन घेण्यासाठी दिवसभर रांगा लागल्या होत्या. पहिल्याच सोमवारचा मान म्हणून बापूसाहेब करजगीकर यांच्या कुटुंबीयांतर्फे योगसमाधीस आकर्षक फुलांची सजावट केली होती. पहाटे ५ वाजता काकडा आरतीने धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता योगसमाधीची विधिवत पूजा करण्यात आली. योगसमाधीस सजावण्यात आलेल्या आकर्षक फुलांमुळे वातावरण टवटवीत बनले होते. सकाळी साडेदहा वाजता मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आरतीचा कार्यक्रम पार पडला. आरती सोहळ्यात हजारो भाविक सामील झाले होते. सकाळच्या आरतीनंतर पुन्हा सायंकाळी ४ वाजता ‘श्री’ची आरती करण्यात आली. रात्री १० वाजता शेजारतीने दिवसभरातील धार्मिक कार्यक्रमांचा समारोप झाला. मध्यरात्रीनंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळत असतानाही शेळगी, दहिटणे, सोरेगाव, मजरेवाडी, कुमठे, होटगी, बाळे, शिवाजी नगर, केगाव या दूरवरचे भाविक पहाटे एक-दीडनंतर स्नान आटोपून घराबाहेर पडले ते पायीच. पहाटे पाच-साडेपाचपर्यंत झुंडीने भाविक श्री सिद्धेश्वर मंदिरात येताना दिसत होते. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी सिद्धेश्वर मंदिर भाविकांनी गजबजले होते. दर्शन सुलभ व्हावे म्हणून देवस्थान पंचकमिटीने महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा केल्या होत्या. मंदिराच्या सभामंडपात भजनाचा कार्यक्रमही रंगला होता. -------------------------------परिवहनची भक्ती सेवासंपूर्ण श्रावण महिन्यात सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी असते. दूरवर राहणाऱ्या भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे जादा गाड्या सोडण्यात आल्याचे सभापती आनंद मुस्तारे यांनी सांगितले. ७, ८, २२, २४ आणि ४७ या मार्गांवरील भाविकांना आता दर्शन सुलभ होणार आहे. -------------------------------पोलिसांचा बंदोबस्तफौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी मंदिर आणि परिसरात मोठा बंदोबस्त लावला आहे. दर्शन रांगेत मध्येच कुणी घुसणार नाही, याची काळजीही पोलिसांकडून घेतली जाते. भाविकांच्या वाहनांसाठी होम मैदानावर स्वतंत्र पार्किंग उभे करण्यात आले आहे.