शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

संस्थात्मक पडझडीने काँग्रेसला फटका..

By admin | Updated: August 17, 2014 23:33 IST

पृथ्वीराज पाटील : आत्मचिंतन करण्याची गरज

सांगली : वसंतदादा पाटील यांनी उभारलेल्या सहकारी संस्था, बँका तसेच शहरातील पतसंस्था बंद पडल्यामुळे सांगली शहर व परिसराची आर्थिक अधोगती झाली. त्यातच गटबाजीचाही फटका बसल्याने गेल्या २९ वर्षांत काँग्रेसला सांगली विधानसभा मतदारसंघात अपवाद वगळता यश मिळू शकले नाही, असे मत प्रदेश काँग्रेसचे सदस्य पृथ्वीराज पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ते म्हणाले की, लोकांना आता बदल हवा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे आकडे पाहिले, तर या गोष्टी लक्षात येतील. सांगली विधानसभा मतदारसंघात कधीकाळी वसंतदादा पाटील ज्याला उमेदवारी द्यायचे, त्याचा विजय व्हायचा. पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांनाही त्यावेळी संधी मिळत होती. १९८५ नंतर आजअखेर पक्षाला सांगली मतदारसंघात एक अपवाद वगळता विजय मिळू शकलेला नाही. त्याची अनेक कारणे आहेत. कारखाना, सूतगिरणी, बँका, पतसंस्था या माध्यमातून वसंतदादांनी निर्माण केलेल्या सहकार चळवळीला मोठा धक्का बसला आहे. अनेक संस्था बंद पडल्याने हजारो लोकांचा रोजगार गेला. साहजिकच त्यांचा संताप पक्षावर निघाला. या बाबींवर कधीही गांभीर्याने विचार झाला नाही. अनेक वर्षांपासून काँग्रेसला गटबाजीचाही मोठा फटका बसला आहे. आजअखेर ही गटबाजी कायम आहे. पक्षांतर्गत कुरघोड्या रोखण्यातही यश आलेले नाही. पूर्वी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो काही वर्षांपूर्वी ढासळला. त्यानंतर वारंवार पक्षाला पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे या गोष्टींचा विचार आता पक्षीय पातळीवर होणे आवश्यक आहे. त्याच त्या चेहऱ्यांना जनता वैतागली आहे. त्यांना नवा चेहरा हवा आहे. गुणवत्ता पाहून पक्षाकडून उमेदवार निवडला जावा, अशी आमची मागणी आहे. काँग्रेसकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मीही अर्ज दाखल केला आहे. उमेदवारांच्या संस्थात्मक, पक्षीय कार्याचा विचार करताना, तो स्वच्छ चारित्र्याचा, सुशिक्षित असावा, याचा विचार केला जावा, अशी आमची मागणी आहे. (प्रतिनिधी)