शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्याचे चिटबॉय झाले गावकारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST

वडवळ : ‘काहीही होवो सत्तेची खुर्ची आपल्याच घरात राहिली पाहिजे’ या व अशा अनेक इच्छेपायी राज्यात सर्वत्र ग्रामपंचायतीच्या ...

वडवळ : ‘काहीही होवो सत्तेची खुर्ची आपल्याच घरात राहिली पाहिजे’ या व अशा अनेक इच्छेपायी राज्यात सर्वत्र ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीने लढवल्या गेल्या. वडवळ ग्रामपंचायतीमध्ये ६५ वर्षातून प्रथमच अनुसूचित जातीच्या जागेसाठी सरपंच पद आरक्षण जाहीर झाले अन एका साखर कारखान्याचे माजी चिटबॉय जालिंदर बनसोडे यांना आता गाव कारभारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

वडवळ ग्रामपंचायतीची स्थापना १९५६ साली झाली व निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद आरक्षण प्रक्रिया ही १९९५ पासून सुरु झाली. या एकूण ६५ वर्षाच्या कालावधीत प्रत्येक निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीचे उमेदवार निवडून येत होते मात्र त्यांना कधी सरपंच पदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली नाही.

वडवळ ग्रामपंचायतीच्या गाव कारभाऱ्यांनी बिनविरोध निवडणूक करून एक आदर्श निर्माण केला होता. दोन्ही गटाकडून अनुसूचित जातीच्या जागेसाठी जालिंदर बनसोडे यांची निवड करण्यात आली. बनसोडे यांनी यापूर्वी उपसरपंच पदावर काम केले आहे. तालुक्यातील एका साखर कारखान्यामध्ये त्यांनी चिटबॉय म्हणून काम केले आहे. आता त्यांना गावचे सरपंच पद भूषवण्याची संधी मिळाली आहे. त्यांची बिनविरोध निवड होताच गावात विविध व्यक्ती,संस्था यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

कोट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा व लोकशाहीचा हा विजय आहे. गावाचा विकास करण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवू. सर्वांना सोबत घेऊन विकास काम करण्यावर आपला भर असेल.

- जालिंदर बनसोडे, सरपंच उमेदवार, वडवळ.

-----

फोटो ओळी:

वडवळच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे कळताच जालिंदर बनसोडे यांचा असा भावुक सत्कार त्यांच्या घरी करण्यात आला.