शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

दानम्मादेवी यात्रेची रथोत्सवाने सांगता

By admin | Updated: November 23, 2014 23:46 IST

गुड्डापुरात भाविकांची गर्दी : महाआरतीचे आयोजन

जत : तालुक्यातील गुड्डापूर येथे रथोत्सव व महाआरती कार्यक्रम होऊन (शनिवारी) दानम्मादेवी यात्रेची सांगता झाली. या यात्रेत सुमारे तीन कोटींची उलाढाल झाली. यात्रेसाठी हजारो भाविकांनी परतीचा मार्ग धरल्यानंतर गुड्डापूर गावातून चारही दिशांना जाणाऱ्या रस्त्यांवर भाविक आणि वाहनांची गर्दी दिसून येत होती.शनिवारी रात्री दानम्मादेवी मंदिरापासून सुमारे पाचशे फूट अंतरावर असलेल्या पादगट्टी येथे खा. संजय पाटील, आमदार सुरेश खाडे (मिरज), आमदार विजयकुमार देशमुख (सोलापूर) यांच्याहस्ते दानम्मा देवीच्या रथाची पूजा करण्यात आली. नंतर मिरवणुकीने देवीचा रथ गावातील बसेश्वर चौकात आणण्यात आला. रथ मंदिर परिसरात आणून मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी भाविकांनी देवीच्या नावाचा जयघोष केला. मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार डी. एम. कांबळे, देवस्थान समिती अध्यक्ष चंद्रशेखर पुजारी, संचालक सी. आर. गोब्बी, बी. एस. गाडवे, सिध्दय्या हिरेमठ, विश्वनाथ गणी, म्हमदापूर गवाप्पा आदी मान्यवर उपस्थित होते.एसटी बस वाहतूक, करमणूक, मेवा-मिठाई, खेळणी, पाळणे आदी बाबीतून यात्रेत सुमारे तीन कोटी रुपयांची उलाढाल झाली. (वार्ताहर)यात्रेत तीन कोटींची उलाढालगुड्डापूर येथील श्री दानम्मा देवीच्या यात्रेस महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधील हजारो भाविक हजेरी लावतात. शनिवारी रात्री मंदिरापासून जवळच असलेल्या पादगट्टी येथे खा. संजय पाटील, आ. सुरेश खाडे, आ. विजयकुमार देशमुख यांच्याहस्ते पूजा करून रथोत्सवास सुरुवात झाली. तीन दिवस सुरू असलेल्या या यात्रेची सांगता रथोत्सव तसेच महाआरतीने झाली. जत आगाराने यात्रेसाठी खास बसेसची सोय केली होती. आगारास लाखोंचे उत्पन्न मिळाले. मेवा मिठाई, खेळणी, करमणुकीचे कार्यक्रम तसेच इतर बाबींतून यात्रेत सुमारे तीन कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.