शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कोठेंचे नगरसेवकपद रद्द करा

By admin | Updated: September 3, 2014 00:41 IST

शहर काँग्रेसचे विभागीय आयुक्तांना पत्र

सोलापूर: माजी महापौर आणि महापालिकेचे सभागृह नेते महेश कोठे यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला; मात्र त्यांना पक्षातून काढण्यात आले़ आता काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार आणि महापालिकेतील विद्यमान सभागृह नेते संजय हेमगड्डी यांनी विभागीय आयुक्तांना पत्र देऊन कोठे यांचे नगरसेवकपद रद्द करावे अशी मागणी केली आहे़मनपा आयुक्तांना देखील हे पत्र दिले असून, अपात्र ठरविण्याचा अधिकार मात्र विभागीय आयुक्तांचा आहे़ कोठे हे बऱ्याच दिवसांपासून पक्ष सोडण्याच्या तयारीत होते़ अखेर ६ आॅगस्ट रोजी त्यांनी पक्ष सोडून शहर मध्यमधून सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला़ त्यानंतर कोठे विरुद्ध काँग्रेस असा सामना सुरू झाला आहे़ कोठे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले़; मात्र त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबत काँग्रेसकडून कोणत्याही हालचाली सुरू नव्हत्या़ मंगळवारी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार आणि संजय हेमगड्डी यांनी संयुक्त पत्र देऊन कोठेंना अपात्र ठरविण्याची मागणी केली आहे़ त्यामुळे कोठेंचा मनपातील पत्ता कट करण्याचा काँग्रेसचा डाव यशस्वी होणार का हे आता विभागीय आयुक्तांच्या हातात आहे़ विभागीय आयुक्तांनी कोठे यांना नोटीस पाठवून सुनावणी घेतली आणि त्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करतील असे प्रथमदर्शनी कायद्यानुसार दिसते़ इकडे महेश कोठे यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर तसेच आमदार प्रणिती शिंदेंवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीकास्त्र सुरू केले असल्यामुळे महिनाभराने का होईना मंगळवारी २ सप्टेंबर रोजी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी काँग्रेसकडून केली आहे़ -----------------------महेश कोठे यांनी स्वेच्छेने ६ आॅगस्ट रोजी शिवसेनेत प्रवेश केला आहे़ शिस्तभंग केली म्हणून त्यांना पक्षातून काढून टाकले आहे़ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ मधील ३ अ नुसार कोठेंना महापालिकेचे नगरसेवक म्हणून अपात्र ठरवावे अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे़- प्रकाश यलगुलवारअध्यक्ष-सोलापूर शहर काँग्रेस