शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापगडाचे सौंदर्य वीजवाहिन्यांनी झाकोळले

By admin | Updated: December 9, 2014 01:24 IST

जावळी जिंकून स्वराज्याचा विस्तार केला. प्रतापगडची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत रोमांचकारी घटना मानली जाते.

अजित जाधव- महाबळेश्वर -जावली म्हणजेच जयवल्ली. ‘येता जावली जाता गोवळी’ म्हणून मिरवली गेलेली चंद्रराव उपाधी धारण करणाऱ्या मोऱ्यांची राजधानी. शिवरायांनी ज्याचा बीमोड केला, जावळी जिंकून स्वराज्याचा विस्तार केला. प्रतापगडची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत रोमांचकारी घटना मानली जाते. याच गडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध करून शिवरायांनी स्वराज्याचा विस्तार केला. अशा या छत्रपतींच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणाऱ्या प्रतापगडाचे सौंदर्य वीजवाहिन्यांच्या जाळ्यात झाकोळले. दरवर्षी लाखोंच्या सख्येने पर्यटक व शालेय सहली प्रतापगडला भेट देतात. गडावर जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्यामुळे तारेवरची कसरत करावी लागते. अवघे चार किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी चार तास लागतात. वाडा-कुंभरोशी ते प्रतापगड हा रस्ता १९५७ मध्ये बनविण्यात आला होता. त्यावेळी आतासारखी वाहतूक नव्हती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. रस्ता रुंदीकरणाची गरज आहे. यासाठी २०१३ मध्ये ४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, अद्याप कामास सुरुवात नाही. प्रतापगडावर १६६१ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते भवानीमातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. राज्याभिषेकापूर्वी शिवराय भवानीच्या दर्शनासाठी आले. १९ मे १६७४ रोजी त्यांनी ५६ हजारांचे सुवर्णछत्र अर्पण केले होते. किल्ल्यावर पश्चिम भागात कडेलोट पॉर्इंट आहे. तेथून रायगड जिल्ह्यातील खेडी दिसतात. ध्वजा बुरुज, तलावाचा बुरुज, अफजल खान बुरुज, रेडका बुरुज, यशवंत बुरुज, केदारेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, चोरवाटा, दरबारी जागा, पाण्याची तळी हे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. पंडित नेहरुंच्या हस्ते उभारला पुतळा प्रतापगडावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते १९५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला.त्यानंतर वनविभागाने पुतळा परिसरात बागबगीचा तयार करून सुशोभीकरण करण्यात आले आहे.गडाच्या पायथ्याला असलेल्या वाहनतळावर शंभर ते दीडशे वाहने उभी राहू शकतात. मात्र, पर्यटकांचा हंगाम असेल त्यावेळी गडावर तीनशे ते चारशे वाहने दाखल होतात. त्यावेळी मोठी अडचण निर्माण होते. वाहनतळाची जागा ही वनविभागाकडे असल्याने येथे वाहनतळ वाढविण्यास जागा मिळत नाही.