शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

परिचारक राष्ट्रीय समाज पक्षात येतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:48 IST

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांच्या घरी सदिच्छा भेटीसाठी आले होते. यादरम्यान त्यांनी ...

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांच्या घरी सदिच्छा भेटीसाठी आले होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, माउली सगर, पोपट क्षीरसागर, परमेश्वर पुजारी, आबासाहेब मोटे यावेळी उपस्थित होते.

आ. गोपीचंद पडळकर राज्यभर दौरे करत आहेत. त्यांना भाजप ओबीसीचा चेहरा म्हणून पुढे करतात का, असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर जानकर म्हणाले, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. ते त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी काम करत आहेत. मला साइड ट्रॅक करण्याचा प्रश्नच उद‌्भवत नाही. माझ्या पक्षामध्ये सर्वसमाजाचे नेते आहेत. माझ्या पक्षात प्रशांत पारिचारक येऊ शकतात. प्रशांत परिचारक तिकडे राहिले तर उमेश परिचारक तर माझ्या पक्षामध्ये येऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत पंढरपूरची जनता भूमीपुत्रालाच साथ देईल. पंढरपूरची जनता सुज्ञ आहे. यामुळे बाहेरून कोणी आलं आणि कोणी गेलं याचा फरक पोटनिवडणुकीत पडणार नाही. राष्ट्रीय समाज पक्षाची पंढरपूरमध्ये ताकत कमी आहे. त्यासाठी संघटनात्मक बांधणी वाढवणार आहे. त्याचबरोबर मागील आठ दिवसांपासून पक्षबांधणी राजभर दौरेही सुरू आहे, असेही ते म्हणाले.

-----

मराठा आरक्षणास कोणाचाच नाही विरोध

वीजबिल माफ करण्याबाबत आश्वासन दिले होते. परंतु महाविकास आघाडी घूमजाव करत आहे. वीजबिल माफ झाले पाहिजे या मागणीबाबत भाजप किती गंभीर आहे, काय माहीत नाही. परंतु रासपची तीच मागणी आहे. मराठा आरक्षणाला कोणत्याच सरकारचा विरोध नाही. यामुळे मराठा समाजातील तरुणांनी आक्रमक होण्याची गरज नसल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले.