शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सन्मान योजनेतील पात्र शेतकºयांच्या खात्याची पडताळणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:30 IST

पाच लाखांवर शेतकरी: अकरा हजार खात्यांमध्ये माहिती भरणे सुरू

ठळक मुद्देशेतकरी सन्मान योजनेतील काम गेल्या दोन महिन्यांपासून जलदगतीने जिल्हा प्रशासनाकडून सुरूजिल्ह्यात ८ - अ नुसार एकूण ११ लाख १४ हजार ९५ इतकी खातेदार शेतकºयांची संख्याएप्रिलअखेर २ लाख ६0 हजार ८२८ शेतकरी कुटुंबाची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली

सोलापूर :  केंद्र शासनाच्या  पीएफएमएस संस्थेकडून  (पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम) प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्याची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली असून यानंतर अंतिम यादीनुसार योजनेतील शेतकºयांना सन्मान निधी थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

शेतकरी सन्मान  योजनेतील काम  गेल्या दोन महिन्यांपासून जलदगतीने जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्ह्यात ८ - अ नुसार एकूण ११ लाख १४ हजार ९५ इतकी खातेदार शेतकºयांची संख्या आहे. यामध्ये कृषी सन्मान योजनेस पात्र ठरलेले शेतकरी ५ लाख १३ हजार ११ इतके आहेत. एप्रिलअखेर २ लाख ६0 हजार ८२८ शेतकरी कुटुंबाची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. यानंतर पुन्हा उर्वरित पात्र शेतकरी कुटुंबांची  माहिती अपलोड  करण्यात येत आहे. आतापर्यंत ५ लाख २ हजार ६४ इतक्या शेतकºयांची माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. अद्याप १0 हजार ९४७ इतक्या शेतकºयांची माहिती अपलोड करण्याचे काम शिल्लक राहिले आहे.

यासाठी शेतकºयांकडील नोंदी, बँक खाते व इतर बाबींमुळे हे काम शिल्लक राहिले आहे. येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी जिल्ह्यातील पात्र शेतकºयांची माहिती शासनाच्या एनआयसी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम ९८ टक्के झाले आहे. 

आता शेवटच्या टप्प्यात एकत्रित कुटुंबात सातबारावर असलेली अनेक नावे, गाव सोडून इतरत्र गेलेल्या खातेदारांच्या बँक खात्याची माहिती मिळणे अवघड झाले आहे. संबंधित शेतकºयांच्या कुटुंबातील सदस्यांना याबाबतची कल्पना देऊन हे काम शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. 

काय होणार तपासणी?- जिल्ह्यातून एनआयसी पोर्टलवर अपलोड झालेल्या पात्र शेतकºयांचा डाटा केंद्र शासनाच्या पीएफएमएस या संस्थेकडून तपासण्यात येणार आहे. तपासणीमध्ये शेतकºयांचे बँक खाते आणि त्यांनी दिलेल्या खातेनंबरच्या बँकांच्या आयएफएससी कोडची पडताळणी केली जाणार आहे. या तपासणीमुळे शेतकºयांच्या नावेच पैसे जमा होणार आहेत. पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेत चुका होऊ नयेत म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजनाSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय