शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस; उजनी धरणाची प्लसकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 11:02 IST

वरुणराजा पावला; उत्तर सोलापूर, अक्कलकोट वगळता सर्व तालुक्यात १०० टक्के नोंद

ठळक मुद्देएक जूनपासून सातत्याने जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहेजून तसेच जुलै महिन्यात रविवारपर्यंत १४४ टक्के पाऊस मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक २२९.७  मि.मी. म्हणजे  १९२ टक्के पाऊस

सोलापूर : अनेक वर्षांनंतर जिल्ह्यात यंदा जून-जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. उत्तर सोलापूर व  अक्कलकोट तालुका वगळता इतर सर्वच  तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

यावर्षी एक जूनला पावसाला सुरुवात झाली. एक जूनपासून सातत्याने जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. जून तसेच जुलै महिन्यात रविवारपर्यंत १४४ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक २२९.७  मि.मी. म्हणजे  १९२ टक्के पाऊस पडला आहे. माढा तालुक्यात २४७ मि. मी.(१८२ टक्के), मोहोळ तालुक्यात २१५ मि.मी (१७०.६ टक्के), माळशिरस तालुक्यात २४० मि.मी. (१६४ टक्के), करमाळा तालुक्यात २०४  मि. मी. (१५१ टक्के), सांगोला तालुक्यात १९८ (१४९ टक्के), बार्शी तालुक्यात २३४  मि.मी. (१४७ टक्के),  पंढरपूर तालुक्यात १९४  मि.मी.(१३८ टक्के) तर दक्षिण सोलापूर तालुक्यात १४५ मि.मी. (१०४ टक्के) इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अक्कलकोट तालुक्यात १५५ मि.मी. (९९ टक्के) तर उत्तर सोलापूर तालुक्यात १५४  मि.मी. (९२ टक्के) पाऊस पडला आहे.

मागील वर्षी  ६९ टक्के पाऊस यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडला असला तरी मागील वर्षी जिल्ह्यात एकूण ६९ टक्के (९८.८ मि.मी.) पाऊस पडला होता. यावर्षी जिल्ह्यात एकूण २०५ मि.मी. म्हणजे १४४ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

सध्या पडलेल्या पावसामुळे समाधानाचे वातावरण आहे. पेरणी झालेली पिके चांगली येतील; मात्र अधिक पाऊस पडला तर नुकसानही होईल. जेमतेम पाऊस पडत राहिला तर खरीप हंगाम चांगला होईल.- राजाराम गरड, शेतकरी, रानमसले

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय