शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी यात्रा : चंद्रभागेतील दुर्घटना टाळण्यासाठी २० जीवरक्षक

By admin | Updated: June 21, 2017 15:27 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि २१ : सध्या सर्वत्र पाऊस पडत असून, चंद्रभागा नदीपात्रातील पाण्याच्या पातळीतही वाढ होत आहे़ शिवाय आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढत आहे़ हे भाविक प्रथम चंद्रभागेत स्नान करूनच श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येतात़ भाविक चंद्रभागेत स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे़ त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी समितीच्या वतीने २० जीवरक्षकांची नियुक्ती केल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांनी दिली़आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर २४ ते ९ जुलै या कालावधीत भाविकांची संख्या सर्वाधिक असते़ हे भाविक चंद्रभागेत स्नानासाठी जात असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी व आपत्कालीन व्यवस्थेसाठी चंद्रभागा वाळवंट व नदीपात्रात संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध बचाव पथक साधनसामुग्रीसह नियुक्त केले आहे़ या पथकाकडे आॅक्सिजनसह असलेले एक वाहन, वॉकीटॉकी, एक बेस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, मोठ्या बॅटऱ्या चार, हँड बॅटऱ्या सहा, अग्निशमन गाड्या दोन, वायर रोप २०० मीटर, साधे रोप ३०० मीटर, लाईफ रिंग पाच, लाईफ जॅकेट पाच आदी सुविधा असतील़ या शिवाय शहरातील गर्दीच्या ठिकाणी काही दुर्घटना घडल्यास मदतीसाठी सोलापूर महानगरपालिका यांच्याकडील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह रेस्क्यू व्हॅन उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती विलास महाजन यांनी दिली़