शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

४६ जण सर्वसाधारण प्रवर्गातून सरपंच होणार; दोन ठिकाणी नशिबाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:49 IST

यामध्ये ७२ ग्रामपंचायतींच्या सध्या निवडणुका झाल्या आहेत, तर पुढच्या टप्प्यात निवडणुका होणाऱ्या २१ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर करण्यात आले. या ...

यामध्ये ७२ ग्रामपंचायतींच्या सध्या निवडणुका झाल्या आहेत, तर पुढच्या टप्प्यात निवडणुका होणाऱ्या २१ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षणाबाबत रोपळे, नारायण चिंचोली येथे पराभूत झालेल्या पॅनलच्या उमेदवारांना सरपंचपदाची संधी मिळाल्याने विजयी पॅनलची निराशा होणार आहे. यामध्ये सर्वसाधारण पुरुष बाभूळगाव, भाळवणी, भोसे, बिटरगाव, चिलाईवाडी, धोंडेवाडी, करोळे, खेडभाळवणी, मुंढेवाडी, सांगवी-बादलकोट, सुगाव भोसे, विटे, वाडीकुरोली, कान्हापुरी, गुरसाळे-वेणूनगर, वाखरी, टाकळी, अनवली, फुलचिंचोली, पुळूज, नांदोरे, तावशी, मगरवाडी आदी २३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे, तर सर्वसाधारण महिलांसाठी देवडे, एकलासपूर, रांझणी, सरकोली, शेळवे, शेटफळ, सिद्धेवाडी-तरटगाव, उंबरे, जळोली, पेहे, सुगाव खुर्द, कौठाळी, देगाव, कासेगाव, खर्डी, आंबे, ओझेवाडी, पटवर्धन कुरोली, उजनी वसाहत, पिराची कुरोली, शंकरगाव-नळी, तुंगत, नेमतवाडी आदी २३ गावांचा समावेश आहे.

ओबीसी पुरुष : लोणारवाडी, शिरगाव, आढीव, चिंचोली भोसे, पोहोरगाव, खरातवाडी, ईश्वरवठार, गोपाळपूर, कोर्टी, बोहाळी, उपरी, जाधववाडी, व्होळे. ओबीसी महिला : जैनवाडी, केसकरवाडी, खेडभोसे, शेंडगेवाडी, गार्डी, करकंब, पुळूजवाडी, अजोती, पांढरेवाडी, तनाळी, टाकळी-गुरसाळे, सुपली.

अनुसूचित जाती पुरुष : खरसोळी, पळशी, भटुंबरे, चळे, मेंढापूर, आंबे-चिंचोली, सोनके, बार्डी, गादेगाव, भंडीशेगाव.

अनुसूचित जाती महिला : आव्हे-तरटगाव, उंबरगाव, नेपतगाव, शिरढोण, शेवते, सुस्ते, कोंढारकी, तिसंगी, नारायण चिंचोली, अजनसोंड.

अनुसूचित जमाती पुरुष : तारापूर अनुसूचित जाती महिला : रोपळे, शेगाव दुमाला आदी गावांचा समावेश आहे. यामध्ये ७२ ग्रामपंचायतींच्या प्रत्यक्षात निवडणुका पार पडल्या आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या २१ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आल्याने त्या गावात निवडणुकांसंदर्भात मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

उमेदवारांचा घोडेबाजार रंगणार

मागील १५ दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जोरदार लढती झाल्या होत्या. यामध्ये स्थानिक आघाड्यांनी बाजी मारत दोन, तीन जागांच्या फरकाने पॅनल निवडून आणले आहेत. यामध्ये रोपळे, नारायण चिंचोलीचाही समावेश होता. रोपळे येथे २५ वर्षांनंतर विरोधी गटाचे पॅनल निवडून आले. मात्र, सरपंचपदाची जागा आरक्षणानुसार विजयी पॅनलकडे नाही, तर नारायण चिंचोलीतही पॅनल पराभूत होऊनही त्याच पॅनलच्या उमेदवाराला आरक्षणानुसार सरपंचपदाची संधी मिळणार आहे. त्यामुळे नशिबाने साथ दिली, तर पॅनल निवडूनही त्यांची निराशा झाल्याचे चित्र आहे. याशिवाय अनेक गावांत दोन्ही पॅनलमध्ये १-२ जागांचा फरक असल्याने येणाऱ्या काळात विजयी उमेदवारांचा घोडेबाजार होणार असल्याचे नक्की आहे. म्हणून काहीजणांनी आपले उमेदवार आजच देवदर्शन, सहलीसाठी पाठविले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत या घडामोडी आणखी वेगवान होणार असल्याचे चित्र आहे.