शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

उजनीत ३३ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:22 IST

भीमानगर : भीमा खो-यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी विश्रांती घेतली. त्यामुळे ६९ हजार ३३३ वर गेलेला ...

भीमानगर : भीमा खो-यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी विश्रांती घेतली. त्यामुळे ६९ हजार ३३३ वर गेलेला विसर्ग रविवारी २५ हजार क्‍युसेकवर आला आहे. दरम्यान, वजा २३ टक्क्यांवर उजनीची पाणीपातळी गेलेली असताना या तीन दिवसात उपयुक्त ३५ टक्क्यांवर पोहोचली आहे. रविवारी सकाळपर्यंत भीमा खोऱ्यात व मुळा मुठाच्या उपखोऱ्यात १२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

भीमा खो-यातील कळमोडीवर ५५ किलोमीटर, घोड उपखोऱ्यात माणिकडोह ३५, पिंपळजोगे ५५, मुळशी ६२, टेमघर ९०, वरसगाव ७०, पानशेत ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला १६६०, वडिवळे ३००, कळमोडी १९०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. खडकवासला प्रकल्पातील विसर्ग कमी केल्याने पुणे येथील बंडगार्डनचा विसर्ग १४५४५ हजार क्‍युसेक इतका झाला आहे. उजनीत येणारा विसर्ग रविवारी संध्याकाळी सहा वाजता २५४४५ क्युसेक इतका झाला आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता उजनी धरण ३२ टक्के झाला आहे.

----

उजनीची सद्यस्थिती

पाणी पातळी ४९३. १५५ मीटर

एकूण पाणीसाठा २२६६.१५ दलघमी (टीएमसी ८०.६५)

उपयुक्त पाणीसाठा ४६३.३४ दलघमी (टीएमसी १६.३६)

विसर्ग बंडगार्डन १४५४५

दौंडमधून २५४०७

टक्केवारी ३३

---