शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २७ बँकाकडे असलेल्या २७७१ कोटी रूपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्हं बँक स्वीकारणार, महसुलमंत्र्याची माहिती

By admin | Updated: June 21, 2017 14:41 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २० : राज्यातील २७ जिल्हा बॅकांकडे रद्द झालेल्या १००० व ५०० रूपयांच्या जुन्या २७७१ कोटी रूपयांच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने हिरवा कंदीला दाखविला असल्याची माहिती राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आॅनलाइन लोकमतशी बोलताना दिली़ राज्यातील शेतकऱ्यांना घोषित झालेल्या कर्जमाफीच्या तोडावर हा निर्णय झाल्याने राज्य सरकारने केंद्राचे व रिझर्व्ह बँकेचे आभार मानल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले़ रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतल्याचे राज्य सरकारला कळविताच मुंबईला राष्ट्रीयकृत बँकांची तातडीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलविली़ या बैठकीला जाण्यासाठी महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सोलापूर विमानतळावरून मुंबईला रवाना झाले़ यावेळी त्यांच्यासमवेत सहकार, पणन व वस्त्रोउद्योगमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, पोलुीस आयुक्त महादेव तांबडे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते़ पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने घेतलेला हा मोठा निर्णय आहे. राज्यातील बँकांकडे पडून असलेल्या नोटांची पुरेशी तपासणी करून त्या स्विकारण्यासाठी मान्यता मिळाल्याने कर्जमाफीच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे आपण आभार मानतो. १० हजार रूपयांचे अग्रीम कर्ज देण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही अनेक बँका टाळाटाळ करीत आहेत. त्याकडे महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, कलम ८९ नुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्ज देणे क्रमप्राप्त आहे. हे कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकांवर कारवाई केली जाईल. या बँकांकडे पैसा नसेल तर त्यांनी तो राज्य सहकारी बँकांना मागावा. या पतपुरठ्याची हमी राज्य सहकारी बँकांनी दिली आहे, याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.