Coldplay viral video: ब्रिटिश रॉक बँड कोल्डप्लेच्या कॉन्सर्टचा एक व्हिडिओ इंटरनेटवर नुकताच व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अँडी बायर्न एका महिलेसोबत दिसले. ही महिला त्यांच्या कंपनीच्या एचआर प्रमुख क्रिस्टिन कॅबोट आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे सीईओंच्या अडचणी वाढल्या आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर अॅस्ट्रोनॉमरचे सीईओ अँडी बायर्न यांच्यावर कंपनीकडून कारवाई करण्यात आली आहे.
कंपनीने काय कारवाई केली?
कोल्डप्लेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये सीईओ अँडी बायर्न एका महिलेसोबत दिसले. त्या महिलेचे नाव क्रिस्टिन कॅबोट असून ती अस्ट्रोनॉमर कंपनीच एचआर हेड प्रमुख पदावर कार्यरत आहे. टेक कंपनीने शुक्रवारी सांगितले की, घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता सीईओ अँडी बायर्न यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. कंपनीने सांगितले की अँडी बायर्नला रजेवर पाठवण्यात आले आहे आणि आता सह-संस्थापक आणि मुख्य उत्पादन अधिकारी पीट डीजॉय अंतरिम सीईओ म्हणून काम पाहत आहेत. मात्र त्या महिलेवर काही कारवाई झाली की नाही, याची माहिती देण्यात आलेली नाही.
कोल्डप्लेचा व्हिडिओ व्हायरल
कोल्डप्लेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये अचानक किस-कॅम सीईओ अँडी बायर्न आणि क्रिस्टिन कॅबोट यांच्याकडे सरकताना दिसला. दोघेही छान एकमेकांच्या मिठीत होते आणि कॉन्सर्टचा आनंद घेत होते. कॅमेरा त्यांच्याकडे सरकताच दोघांनीही आपले चेहरे लपवायला सुरुवात केली. कॅमेऱ्याच्या नजरा टाळण्याचाही प्रयत्न केला. हे पाहून कोल्डप्ले सिंगर ख्रिस मार्टिन गोंधळून गेला. तो म्हणाला, की एकतर या दोघांमध्ये अफेअर आहे किंवा दोघेही खूप लाजाळू आहेत.
नंतर समोर आलेल्या बाबीनुसार, सीईओ अँडी बायर्न बायर्न विवाहित आहेत. तर दुसरीकडे, एचआर हेड क्रिस्टिन कॅबोट देखील विवाहित आहेत. त्यामुळे अनेक लोकांनी या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर टीका केली.
सीईओ अँडी बायर्न कोण आहेत?
अँडी बायर्न हे अॅस्ट्रोनॉमर कंपनीचे सीईओ आहेत. ही कंपनी ११ लाख कोटींची आहे. अँडीने जुलै २०२३ मध्ये सीईओची जबाबदारी स्वीकारली. अँडीला दोन मुले देखील आहेत. तो त्याच्या पत्नी आणि मुलांसह न्यूयॉर्कमध्ये राहतो. आता व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याला रजेवर पाठवण्यात आले आहे. कंपनीने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, संचालक मंडळाने या प्रकरणाची औपचारिक चौकशी सुरू केली आहे.