शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
5
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
6
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
7
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
8
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
9
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
10
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
11
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
12
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
13
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
14
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
15
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
16
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
17
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
18
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
19
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
20
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल

कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढचा निर्णय घेऊ

By admin | Updated: June 29, 2014 00:50 IST

दीपक केसरकर : राष्ट्रवादी विरोधात बंडाचा झेंडा

मालवण : राजीनाम्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने अडचणीत आलेल्या राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी शुक्रवारी रात्री मालवणात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादी विरोधात बंडाचा झेंडा फडकवला. मालवण येथील पत्रकार परिषदेत आमदार केसरकर यांनी राष्ट्रवादीत आपला अपमान झाला असून पद पाहिजे म्हणून लाचार होणाऱ्यांपैकी मी नाही. सिंधुदुर्गवासियांचा स्वाभिमानी बाणा काय असतो हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना दाखवून देऊ असे ठणकावत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच पुढचा निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. याच पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करीत आमदार केसरकर यांनी मुहूर्त कुठला काढणार ते त्यांनाच विचारा असे सांगून आपण व आपले कार्यकर्ते शिवसेनेत जाणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत.काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या विरोधातील राजकीय बंड पुकारल्यानंतर दीपक केसरकर हे पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मालवणात दाखल झाले. मालवण नगरपरिषद प्रभाग ३ क च्या पोटनिवडणुकीत शहर विकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादीच्या उमेदवार मेघा गावकर यांच्या प्रचारार्थ आमदार केसरकर यांनी मालवणातील नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार केसरकर पुढे म्हणाले, मालवणात काँग्रेसने जनभावनांचा अनादर करीत लोकशाहीची क्रूर चेष्टा चालवली आहे. त्यामुळे नागरिक मेघा गावकर यांना निवडून देऊन काँग्रेसला धडा शिकवतील. तसेच उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत शहरविकास आघाडीचे सदस्य असणाऱ्या राजन वराडकर यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता असणाऱ्या शहर विकास आघाडीचे वराडकर हे सदस्य असल्याने गटनेते रविकिरण आपटे यांनी त्यांना बजावलेला ‘व्हीप’च अंतिम आहे. काँग्रेस नगरसेवक अशोक तोडणकर यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असताना त्याला स्थगिती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना नाहीत. उच्च न्यायालयच त्याला स्थगिती देऊ शकते. त्यामुळे उपनगराध्यक्ष निवडणुकीत तोडणकर यांना मतदानाची दिलेली संधी ही बेकायदेशीर आहे. त्यामुळे मालवणची उपनगराध्यक्ष निवड रद्द होणार आहे असेही आमदार केसरकर म्हणाले. तसेच मालवणच्या पर्यटन विकासात आपण लक्ष घालणार आहोत व आपला दहशतवादविरोधी लढा असाच पुढे सुरु राहणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, उपनगराध्यक्ष राजेश पोकळे, मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, उमेदवार मेघा गावकर, नितीन वाळके, बाबी जोगी, शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)