शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

‘पेयजल’वरून वादळी चचा

By admin | Updated: December 2, 2014 23:32 IST

स्थायी समिती सभा : ‘तो’ निधी वर्ग करण्यावरून वादंर्ग

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय पेयजलची कामे पूर्ण करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेला ५ कोटी रूपये तत्काळ वर्ग करा, असे आदेश शासनाने सिंधुदुर्गच्या ग्रामीण विभागाला दिले आहेत. या मुद्यावरून सभागृहात वादळी चर्चा झाली. एकही पैसा ‘त्या’ जिल्हा परिषदेला वर्ग करू नये, असा ठराव मंगळवारच्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला.जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, शिक्षण व आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, वित्त व बांधकाम सभापती संजय बोंबडी, महिला व बालविकास सभापती स्रेहलता चोरगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, सदस्य सतीश सावंत, मधुसुदन बांदिवडेकर, अ‍ॅड. रेवती राणे, वंदना किनळेकर, श्रावणी नाईक, पुष्पा नेरूरकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय पेयजलची कामे पूर्ण करण्यासाठी १० कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ३ कोटी ४२ लाख ३५ हजार रूपये १५ वाड्यांच्या पेयजलच्या कामावर खर्च करण्यात आला आहे. तर अजून या योजनेवर सुमारे साडेसहा कोटी खर्च होणे बाकी आहे. त्यामुळे शासनाने अखर्चित राहिलेली रक्कम पाहता यातील ५ कोटी रूपये रायगड जिल्हा परिषदेला वर्ग करा, असे आदेश सिंधुदुर्ग ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला प्राप्त झाला आहे. हा आदेश प्राप्त होऊन आठ दिवस झाले तरी याबाबत जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना कल्पना न दिल्याने अध्यक्ष संदेश सावंत यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता देशमुख यांना चांगलेच धारेवर धरले. तरी ‘त्या’ जिल्हा परिषदेला एकही पैसा वर्ग करू नये, असा महत्त्वपूर्ण ठराव आजच्या सभेत घेण्यात आला.राष्ट्रीय पेयजलअंतर्गत सन २०१०-११ पासून तब्बल ८६ कामे कुडाळ तालुक्यात पेंडीग आहेत. तर काही ठिकाणी विहिरींची कामे झाली आहेत. तेथे ठेकेदारांची बिले काढण्यात आलेली नाहीत. यामागे कोणत्या शाखा अभियंत्याचा समावेश आहे याची सविस्तर माहिती मिळावी, अशी सूचना सतीश सावंत यांनी करत आक्रमक रूप धारण केले. शाखा अभियंत्याकडून आपल्या ‘फायद्या’च्या कामाची फाईल हलवली जाते. असा आरोप करताना यामुळे ठेकेदारांची कामे रखडत असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)तळेरे-विजयदुर्ग मार्गाचे काम निकृष्टदेवगड ते नांदगाव या राज्य मार्गावरील खड्डे भरण्याचे काम चांगल्याप्रकारे केले जात आहे. त्याचप्रमाणे तळेरे ते विजयदुर्ग याही राज्यमार्गावर खड्डे भरण्याचे काम सुरू आहे, मात्र या मार्गावरील खड्डे भरताना खड्ड्यातील माती न काढता त्यात डांबर ओतले जात आहे. त्यामुळे त्या मार्गावर पुन्हा खड्डे पडायला सुरूवात झाली आहे. या मार्गावर दररोज शेकडो वाहने ये-जा करततात. मात्र, या महत्वाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. अशी माहिती बांधकाम सभापती संजय बोंबडी यांनी देत सभागृहात नाराजी व्यक्त केली.काम थांबवा, पंचयादी घालाआरटीओ चेकपोस्ट इन्सुली येथे टेलिफोनची केबल टाकण्यासाठी जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची खोदाई केली जात आहे. जिल्हा परिषदेला याबाबत कोणतीही कल्पना न देता रस्त्याची नासधूस केली जात आहे, असा मुद्दा सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी उपस्थित केला. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी संबंधित ठिकाणी जाऊन काम थांबवा व पंचयादी घाला, असे आदेश प्रशासनाला दिले.