शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

पाडव्याचा मुहूर्त हुकणार?

By admin | Updated: March 4, 2015 23:39 IST

संजय पानसरे : वाशी मार्केटमध्ये ७ हजार आंबा पेट्या रवाना

रत्नागिरी : दरवर्षी गुढी पाडव्याला मोठ्या प्रमाणात मुंबईतील मार्केटमध्ये विक्रीला जाणाऱ्या आंब्याचा मुहूर्त यावर्षी हुकणार असल्याचे दिसून येते. सध्या किरकोळ स्वरूपात आंबा मुंबई मार्केटमध्ये दाखल झाला आहे. वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील मिळून एकूण ७ हजार पेटी बुधवारी दाखल झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आवक चांगली असल्याचे संजय पानसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जानेवारी महिन्यापासून एखाद दुसरी किरकोळ आंबा पेटी मार्केटमध्ये विक्रीला येत आहे. दररोज आंबा विक्रीला येत असला तरी प्रमाण कमी आहे. दरवर्षी गुढी पाडव्यानंतर आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढते. दररोज ५० हजारापेक्षा अधिक आंबापेट्या विक्रीस दाखल होतात. मात्र, अवकाळी पावसामुळे यावर्षी गुढी पाडव्याचा मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर अवकाळी पावसाचा परिणाम झाला असून, पीक धोक्यात आले आहे. फुलोऱ्यामध्ये पाणी साचल्याने कुजण्याबरोबर फळे गळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय जो आंबा मोठा होता त्या आंब्यावर काळे डाग पडण्याबरोबर आंबा देठाजवळ कुजून गळण्याचा संभव आहे. गेले दोन दिवस कडकडीत ऊन पडत असले तरी हवेत मात्र गारवा आहे. त्यामुळे तुडतुडा वाढण्याची भीती आहे. त्यामुळे भुरी तसेच तुडतुड्यापासून संरक्षण करण्यासाठी अजून फवारणी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक भुर्दंड बसणार आहे.तयार आंबा शेतकऱ्यांनी बाजारात पाठविण्यास सुरूवात केली आहे. परंतु प्रमाण अल्प आहे. आंबा पेटीला सध्या २ ते ५ हजार रूपये दर मिळत आहे. यावर्षी अवकाळीमुळे बहुतांश पीक नष्ट झाल्याने प्रमाण अल्प आहे. त्यामुळे दर टिकून राहील, अशी अपेक्षा आहे. मुंबई शहरात आंब्याची सर्वाधिक विक्री उत्तर प्रदेशातील भय्ये करतात. होळीचा सण साजरा झाल्यानंतर भय्ये मुंबईत दाखल होतात. त्यामुळे यावर्षी १५ मार्चपर्यंत येण्याची शक्यता आहे. शिवाय २० मार्चपासून आंबा मार्केटमध्ये वाढण्याची अपेक्षा असल्याचे पानसरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दरवर्षी पाडव्यानंतर आंब्याची आवक होते मोठ्या प्रमाणात.दररोज ५० हजारपेक्षा अधिक आंबापेट्या विक्रीस उपलब्ध होतात.अवकाळी पावसामुळे यंदा गुढी पाडव्याचा मुहूर्त हुकणार ?अवकाळी पावसामुळे ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर परिणाम.तुडतुडा रोग वाढण्याची भीती.