शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

‘जैतापूर’विरुद्धचा संघर्ष कायम ठेवणार

By admin | Updated: June 19, 2014 01:14 IST

ग्रामस्थ ठाम : काँग्रेस आणि भाजप सरकारमध्ये फरक नाही

राजापूर : यापूर्वीचे काँग्रेस सरकार आणि आताचे भाजप सरकार यांच्यामध्ये जराही फरक नाही. ते एकाच माळेचे मणी आहेत. त्यांना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करायचा नाही, हेच दिसून येते. त्यामुळे प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत संघर्ष कायम राहील, असा निर्धार समस्त प्रकल्पविरोधकांनी नाटे येथे केला. प्रकल्पाविरोधातील मोर्चानंतर आयोजित सभेत ग्रामस्थांनी ही भूमिका मांडली. जनहक्कसमितीच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रकल्प विरोधकांचा मोर्चा साखरी नाटेमधील हुजरा भागापासून सुरू झाला. नाटे येथील तबरेज चौकापर्यंत बुलंद घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या मोर्चात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील, जनहक्कसमितीचे अध्यक्ष भिकाजी वाघधरे, सचिव व पं. स.चे सदस्य दीपक नागले, जि. प.चे सदस्य अजित नारकर, शीतल हर्डीकर, पर्यावरण तज्ज्ञ सत्यजित चव्हाण, शास्त्रज्ञ प्रदीप इंदूलकर, मंगेश चव्हाण, मन्सूर सोलकर, अलिमियाँ म्हसकर, मौलाना तालीब बांगी, नजीक तमके, सभापती कमलाकर कदम, विलास अवसरे, राजन कोंडेकर, पं. स. सदस्या रेखा कोंडेकर, विभागप्रमुख राजा काजवे, रविकिरण तोरस्कर, विलास केरकर, अमिन हकीम, मच्छिमार नेते अमजद बोरकर, अलिमियाँ म्हसकर यासहित परिसरातील बागायतदार मच्छिमार आणि तमाम प्रकल्प विरोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तबरेज चौकात झालेल्या सभेत प्रकल्प हटविण्याबाबतचा निर्धार कायम असल्याचेच सर्व वक्त्यांनी सांगितले. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली. काँग्रेसप्रमाणेच या सरकारकडून न्याय मिळेल याची अपेक्षा करण्यात अर्थ नाही, असे सांगताना त्यांनी आपला लढा कायम ठेवण्याचे आवाहन केले. शिवसेना प्रकल्पाच्या विरोधात असल्याने नक्की हा प्रकल्प रद्द होईल, असा विश्वास मच्छिमार नेते अमजद बोरकर यांनी व्यक्त केला. यापूर्वी साखरी नाटेमध्ये आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प रद्द करण्याचे वचन दिले आहे. ते आपला शब्द नक्की पाळतील, अशी आशा बोरकर यांनी व्यक्त केली. आंदोलनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)