शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘सुरक्षा रक्षक’ जबाबदारी कोणाची?

By admin | Updated: December 11, 2014 23:41 IST

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : नोकरीसाठी गेले चार दिवस उपोषण सुरू

रजनीकांत कदम - कुडाळ -गेली अनेक वर्षे एमआयडीसीमध्ये सेवा बजावूनही नोकरी नोंदणीकृत नसल्याच्या कारणास्तव नाकारल्याने एमआयडीसीच्या स्थानिक सुरक्षा रक्षकांनी गेले चार दिवस आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या या अवस्थेला एमआयडीसी प्रशासन की सुरक्षा रक्षक बोर्ड जबाबदार आहे, हा प्रश्न आहे. या परिस्थितीमुळे जुने सुरक्षा रक्षक व नवीन सुरक्षा रक्षक यांच्यात वाद निर्माण झाले आहेत.कुडाळ एमआयडीसी ही प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचे प्रश्न, समस्या, आजारी उद्योग यांच्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली. यावेळी एमआयडीसी सुरक्षा रक्षकांच्या नोकरीवरुन मोठा वाद निर्माण झाला असून गेली दहा ते बारा वर्षे याठिकाणी सेवा बजावलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांना एमआयडीसीच्या सुरक्षा रक्षक बोर्डाने केवळ नोंदणीकृत नसल्याने नोकरीवरुन कमी करत त्या ठिकाणी नवीन सुरक्षा रक्षकांची भरती केली आहे.गेली दहा बारा वर्षे केलेली सेवा, वाढते वय, कुटुंबाचा उदरनिर्वाह, त्यासाठी काढलेले कर्ज, तुटपुंज्या पगारात चालविण्यात येणारे घर, आजारपण, मुलांचे शिक्षण याची व्यवस्था करत असताना या सुरक्षा रक्षकांना मोठी कसरत करावी लागत असतानाच अचानकपणे नोकरीवरुन कमी व्हावे लागत असल्याने सुरक्षा रक्षक व त्यांच्या कुटुंबावर मोठे आभाळच कोसळले आहे. कुडाळ एमआयडीसी येथे या अगोदर सुरक्षा रक्षक एजन्सीच्यावतीने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती गेली अनेक वर्षे करण्यात आली होती. आता एमआयडीसी प्रशासनाच्या नवीन ध्येयधोरणांनुसार या ठिकाणी कायमस्वरुपी सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात आली. परंतु या भरतीमुळे अगोदर कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना मात्र नोकरी गमवावी लागली. गेली अनेक वर्षे येथे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी केलेल्या व आता नोंदणीकृत नसल्यामुळे नोकरी गमावण्याची वेळ आलेल्या या २० सुरक्षा रक्षकांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाह कसा चालवायचा, अशी समस्या उभी आहे. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांनी आमची सुरक्षा रक्षक म्हणून नोंदणी करून घेऊन आम्हाला सेवेत घ्यावे, अन्यथा आंदोलन मागे घेणार नाही, असे म्हणत सोमवारी सकाळपासून कुडाळ एमआयडीसी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. इतके वर्ष सेवा करुन आम्हालाच डावलण्यात आले. काहीजणांचे शासकीय नोकरीसाठी लागणारे वयही निघून गेल्यामुळे दुसरीकडे नोकरी मिळण्याचीही खात्री नाही. लेखी मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणारइतकी वर्षे आम्ही येथे सेवा बजावून आमच्यावर ही पाळी येत आहे. आम्ही आता मागे हटणार नाही. जोपर्यंत आम्हाला एमआयडीसी प्रशासन नोकरीसंदर्भात लेखीपत्र देत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आमरण उपोषण मागे घेणार नाही. येथील एमआयडीसी प्रशासनाच्या काहीशा चुकीमुळे भरतीसंदर्भात निर्माण झालेल्या वादामुळे आता या ठिकाणच्या स्थानिक सुरक्षारक्षकांना मात्र, उपासमारीला सामोरे जावे लागत आहे.- उपोषणकर्ते,एमआयडीसी, कामगार कुडाळनेमकी चूक कोणाची?गेली दहा ते बारा वर्षे सेवा बजावलेल्या या स्थानिक सुरक्षा रक्षकांची केलेली भरतीही बेकायदेशीर आहे. कारण भरती करणाऱ्या सुरक्षारक्षक मंडळे बोर्डाची निर्मिती ३0 जुलै २0१४ रोजी झाली आहे. या मंडळाने नोंदणी शासन निर्णय २ मार्च २00९ नुसार केली पाहिजे होती. तसेच २५ आॅगस्ट २0१0 नुसार सध्या कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना सामावून घेतले पाहिजे. असे असताना मंडळाने एमआयडीसी १ एप्रिल २0१४ चे मागणी पत्र जे कोल्हापूर मंडळाला दिले होते. ते ग्राह्य मानने चुकीचे आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे रत्नागिरीतील तेरा सुरक्षारक्षक भरलेत. मात्र, सिंधुदुर्गमधील नाहीत.या सुरक्षा रक्षकांची भरती का नाही?दहा ते बारा वर्षे सेवा केलेल्या सुरक्षा रक्षकांची भरती का करण्यात आलेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हे सुरक्षा रक्षक विद्यांचल सुरक्षा रक्षक एजन्सीच्यावतीने याठिकाणी काम करत होते.यांची सुरक्षा रक्षक म्हणून एमआयडीसीकडे नोंदणी करणे आवश्यक होते. मात्र, ही नोंदणीकृत नसल्याने त्यांची या नोकरीत भरती होऊ शकली नाही, असे कारण एमआयडीसी प्रशासन देते. मात्र, याबाबत वस्तुस्थितीची माहिती घेणे आवश्यक आहे.ज्या एमआयडीसीमध्ये सुरक्षा रक्षक सेवा बजावत आहेत, त्यांनीच नोंदणीसाठी आपली नावे सुरक्षा रक्षक बोर्डाकडे पाठविण्याची गरज असते. कुडाळ एमआयडीसीचे अधिकारी आम्ही सुरक्षा रक्षक मंडळ बोर्डाकडे नोंदणी केल्याचे सांगत आहेत. मग या भरतीत या सुरक्षा रक्षकांना न घेता नवीन सुरक्षा रक्षकांची कशी भरती केली ? रत्नागिरी एमआयडीसीने सुरक्षा रक्षकांची नोंदणी बोर्डाकडे वेळीच केल्यामुळे तेथे हा प्रश्न नाही.