देवरुख (जि. रत्नागिरी) : कोंंडआंबेरे (ता. संगमेश्वर) ग्रामपंचायत इमारतीचे काम पूर्ण होऊनही त्याच्या मूल्यांकनासाठी अंतिम बिल देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता संतोष भालेकर याला १३ हजार रुपयांची लाच घेताना रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयातच आज, शुक्रवारी सायंकाळी रंगेहात पकडले. ही कारवाई करणाऱ्या रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकात उपविभागीय पोलीस अधिकारी विराग पारकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर घोसाळे, पोलीस नाईक प्रकाश सुतार, हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर भागवत, प्रवीण वीर, गौतम कदम यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
लाच घेताना कनिष्ठ अभियंता चतुर्भुज
By admin | Updated: June 28, 2014 00:17 IST