शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

स्वार्थासाठी दैवते बदलणाऱ्यांना टीकेचा काय अधिकार?

By admin | Updated: July 30, 2014 22:58 IST

सतीश सावंत : शिवसेनेबाबत कायमच अवहेलना, दीपक केसरकरांना टोला

कणकवली : दहशतवादाच्या मुद्यावरून आमदार दीपक केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्याला बदनाम करीत आहेत. येथील विकासात अडथळा आणण्याचे काम आतापर्यंत त्यांनीच केले आहे असा आरोप करतानाच आपल्या स्वार्थाप्रमाणे दैवते बदलणाऱ्या केसरकरांना नारायण राणे यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही, असा टोला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे. येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, दीपक केसरकर नारायण राणे यांच्यावर विनाकारण टीका करीत आहेत. भगवी टोळी म्हणून आतापर्यंत शिवसेनेची अवहेलना करणाऱ्या केसरकरांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणांवर नतमस्तक व्हावे असे आता वाटत आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जाहीर कार्यक्रमात केसरकर यांनी कधी साधी श्रद्धांजलीही त्यांना वाहिलेली नाही. आपल्या स्वार्थाप्रमाणे दैवते बदलण्याची सवय केसरकर यांना आहे. १९९७ मध्ये नगराध्यक्ष तसेच २००९ मध्ये आमदार होण्यासाठी ते नारायण राणे यांच्यासमोर नतमस्तक झाले होते. तर २००९ मध्येच प्रविण भोसलेंना डावलून आपल्याला आमदारकी मिळावी यासाठी शरद पवार तसेच अजित पवार यांच्याही चरणाशी ते नतमस्तक झालेले जनतेने पाहिले आहे. भविष्यात आदित्य ठाकरे यांच्या चरणांशी नतमस्तक झालेले केसरकर जनतेला पहायला मिळतील. त्यांना जनतेबद्दल तसेच विकासाबाबत काहीही सोयरसुतक नाही. एक अकार्यक्षम आमदार म्हणूनच त्यांची ओळख निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीने मंत्री करावे म्हणून नारायण राणे यांच्यावर यापूर्वी ते टीका करीत होते. त्यामुळे राणेंचे नाव न घेता केसरकर यांनी जिल्ह्यात राजकारण करून दाखवावे. तिलारी येथून सावंतवाडी, मालवण, कुडाळ या तालुक्यात नळयोजनेद्वारे करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेला केसरकर यांनीच विरोध केला होता. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून आपण पुन्हा निवडून येवू शकत नाही हे माहित असल्यानेच त्यांची राणेंवर टीका सुरु आहे. शिवराम दळवी यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे आपल्याला पुन्हा आमदारकीचे तिकिट मिळणार नाही हे समजल्यानेच त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. दहशतवादाच्या गोष्टी करणाऱ्या केसरकरांनी सावंतवाडीपुरता तरी शिवसेनेतला दहशतवाद प्रथम थांबवून दाखवावा. त्यांना दहशतवाद पहायचा असेल तर त्यांनी बेळगाव येथील येळ्ळूर येथे जावे. आपल्यामुळे शिवसेनेला लोकसभेत मताधिक्य मिळाल्याचा भ्रम त्यांना झाला असून हा भ्रमाचा भोपळा आगामी निवडणुकीत निश्चितच फुटेल असे सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले. (वार्ताहर)