शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्नी सर्व पक्ष एकवटणार

By admin | Updated: October 19, 2015 22:38 IST

आज बैठक : पाण्याचा थेंब न देण्याचा निर्धार

नाशिक : गंगापूर धरणात ७० टक्के पाणीसाठा असूनही नाशिककरांनी भविष्याची चिंता वाहत पाणीकपातीचा स्वीकार केला आहे. नाशिककर आतापासूनच पाणीटंचाईला सामोरे जात असताना कोणत्याही परिस्थितीत गंगापूर धरणातील पाण्याचा एक थेंबही बाहेर जाऊ देणार नाही, असा निर्धार शिवसेनेने केला आहे. दरम्यान, उद्भवलेल्या पाणीप्रश्नी सर्व पक्षांच्या शहर व जिल्हा प्रमुखांची बैठक मंगळवारी (दि. २०) महापालिकेत सेना गटनेता कार्यालयात दुपारी ४ वाजता घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने गंगापूर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात १.३६ टीएमसी पाणी वहन मार्गाने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास विरोध दर्शवित अजय बोरस्ते यांनी सांगितले की, गंगापूर धरणात आजमितीला ७० टक्के पाणीसाठा आहे. नाशिक महापालिकेने भविष्यात कमी होणारा पाणीसाठा लक्षात घेऊन शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि नाशिककरांनीही मोठ्या मनाने पाणीकपातीच्या निर्णयाचा स्वीकार केलेला आहे. परंतु, सरकार नाशिककरांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. शहरात वर्षभर सिंहस्थ कुंभमेळा सुरू राहणार आहे. कुंभमेळ्यातील महत्त्वाच्या तिथींना लाखो भाविक शहरात येत आहेत. त्यासाठीही पाणी आरक्षण आहे. अशा स्थितीत धरणातील पाणी वहन मार्गाने नेऊन वाया जाऊ दिले जाणार नाही. शिवसेना त्याविरोधात आक्रमक भूमिका घेईल. ज्या कुणी अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला त्यांचे डोके ठिकाणावर आहे काय, असा सवालही बोरस्ते यांनी केला. दरम्यान, या पाणीवाटपाबाबत सर्व पक्षांच्या शहर व जिल्हा प्रमुखांची एकत्रित बैठक मंगळवारी बोलाविण्यात आली असून, त्यात आंदोलनाची पुढील रुपरेषा निश्चित केली जाणार असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.