शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
3
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
4
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
5
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
6
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदिपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
7
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
8
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
9
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
10
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
11
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
12
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
13
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
14
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
15
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
16
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
17
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
18
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
19
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."

देवगड रूग्णालयाला ग्रामस्थांनी घेरले

By admin | Updated: December 26, 2015 23:54 IST

वातावरण तंग : मृतांच्या नातेवाईकांसाठी ग्रामस्थांची हुज्जत, आरोग्यमंत्री, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

देवगड : देवगड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एन. आगाशे यांच्या हलगर्जीपणामुळे संदीप कावले यांचा नाहक बळी गेल्याने संतप्त देवगड जामसंडेवासीयांनी देवगड ग्रामीण रूग्णालयाला घेराव घालून देवगड जामसंडे रस्ता सुमारे २ ते ३ तास रोखून ठेवला. यावेळी ग्रामस्थ आक्रमक होऊन आरोग्य मंत्री दीपक सावंत व प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत असल्याने वातावरण तंग झाले होते. तसेच ग्रामीण रूग्णालयामध्ये ग्रामस्थांनी घुसून डॉक्टरांशी मृताच्या नातेवाईकांना न्याय मिळण्यासाठी हुज्जत घातली. यामुळे देवगडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने ओरोस येथून पोलीस दलाची राखीव फौज मागविण्यात आली होती. देवगड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आगाशे यांनी कावलेवाडी येथील संदीप कावले याला शरीरदुखीचे इंजेक्शन दिल्याने इंजेक्शनचे रिअ‍ॅक्शन होऊन कावले यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना समजताच कावले हे रिक्षा व्यवसायिक असल्याने तालुक्यातील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व देवगड जामसंडे कावलेवाडी येथील ग्रामस्थांनी तत्काळ देवगड ग्रामीण रूग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेऊन आक्रमक भूमिका घेतली. यावेळी मृताच्या नातेवाईकांना तत्काळ नोकरी, हलगर्जीपणा केलेल्या डॉक्टरवरती तत्काळ कारवाई तसेच नुकसानभरपाई असा प्रमुख तीन मागण्या करण्यात आल्या. मात्र, सात तास उलटूनदेखील जिल्हा शल्य चिकित्सक देवगड ग्रामीण रूग्णालयात हजर न झाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन रूग्णालयाला ठाळे ठोकले. त्यानंतर ग्रामस्थांचा मोर्चा देवगड जामसंडे प्रमुख रस्त्याकडे वळून सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन करून शासनाविरोधात घोषणाबाजी करत रूग्णालयाचा परिसर दुमदुमून सोडला होता. अखेर ४ वाजण्याच्या सुमारास जिल्हा शल्यचिकित्सक देवगडमध्ये दाखल होताच ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन त्यांना घेराव घालून जाब विचारला. तसेच देवगड ग्रामीण रूग्णालयामध्ये नारायण हरी वागट (४२, रा. मिठमुंबरी) व गुणाबाई बाजीराव जाधव (६९, रा.तळेबाजार) यांनाही उपचार करतेवेळी डॉ. आगाशे यांनी तसेच इंजेक्शन दिले गेल्यामुळे रिअ‍ॅक्शन हॉऊन त्यांचीही प्रकृती अस्वस्थ झाली होती. त्यांना देवगड खासगी रूग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. तसेच मृत कावले यांच्या पत्नीला जिल्ह्यामधील आरोग्य विभागामध्ये रिक्त जागांची नोकर भरती जाहीर झाल्यानंतर विशेष बाब म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बिलोलीकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ग्रामस्थांमध्ये झटापटी : पोलीस छावणीचे स्वरूप ४उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी जिल्हा मुख्यालयामधून पोलीस फौजफाटा तसेच विजयदुर्ग व आचरा पोलीस ठाण्यामधून पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. यावेळी देवगड पोलीस निरीक्षक मधुकर आभाळे, विजयदुर्ग पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, महिला उपपोलीस निरीक्षक एम. आर. पाटे, एम. एम. भालेकर, चंद्रकांत लाड, राजन पाटील, सुरेश पाटील, एस. एस. भागवत आदी पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ४दरम्यान, संतप्त आंदोलनकर्त्यांना आवरताना पोलिसांच्या नाकीदम आले होते. यामुळे काहीवेळा पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये झटापटीच्या घटना घडल्या.