शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

गाव विकासासाठी एकजूट हवी : राऊत

By admin | Updated: March 5, 2016 00:11 IST

डेगवे हितवर्धक संघाचे सातवे संमेलन उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांसह मान्यवरांचा सत्कार

बांदा : डेगवे गाव हे निसर्गसंपन्न आहे. या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी डेगवेवासीयांनी एकजुटीने व एकमताने कार्य करणे गरजेचे आहे. येथील श्री स्थापेश्वर-महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपले पूर्ण सहकार्य असणार आहे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी मुंबई येथे केले.मुंबई येथील डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाच्या मुंबई-विलेपार्ले येथे झालेल्या सातव्या वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात खासदार राऊत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार गुरुनाथ देसाई होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार शिवराम दळवी, महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रंथालय संचालक डॉ. बी. ए. सनान्से, मराठा बँकेच्या अध्यक्षा अनुश्री माळगावकर, आदी मान्यवर उपस्थित होते. विनायक राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गुरुनाथ देसाई यांनी स्वागत केले. सरचिटणीस उल्हास देसाई यांनी संस्थेच्या ६८ वर्षांच्या कार्यकाळातील कार्याचा अहवाल मांडला. यावेळी स्थापेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी आवाहन पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह, गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला. खासदार विनायक राऊत यांना गावातील विविध प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. सनान्से, शिवराम दळवी यांनी विचार मांडले. सांस्कृतिक कार्यक्रम झाले. माधवी देसाई व किशोर देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुदेश देसाई यांनी आभार मानले. यावेळी उपाध्यक्ष तातोबा देसाई, खजिनदार नितीन देसाई, गोपाळकृष्णा वराडकर, रमेश पडवळ, दत्ताराम देसाई, नंदादीप वाचनालयाचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र देसाई, सुरेश देसाई, निता देसाई, पल्लवी वराडकर, दर्शना देसाई, विकास नाईक उपस्थित होते. (प्रतिनिधी)