शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात हिंदी पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रम

By admin | Updated: September 4, 2014 00:05 IST

राज्य हिंदी शिक्षक महामंडळ : शिक्षण तसेच बँकींग क्षेत्रातर्फे राबवणार उपक्रम

चिपळूण : हिंदी भाषेला दि. १४ सप्टेंबर १९४९ रोजी राष्ट्रभाषेचा दर्जा मिळाला आहे. तेव्हापासून राज्यात हा दिवस हिंदी राष्ट्रभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दि. ३० सप्टेंबरपर्यंत सर्वत्र हिंदी पंधरवडा साजरा केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा अनुदानित, विनाअनुदानित इंग्रजी उर्दू माध्यमाच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालय, बँका व जिल्हा तालुका मंडळातर्फे हा राष्ट्रभाषा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.जगातील १८९ देशांमधून हिंदी भाषा बोलली जाते. हिंदी भाषा विश्वभाषा बनली आहे. हिंदीमधील लेखक, कवी, कादंबरीकार, एकांकिकाकार, नाटककार व हिंदी साहित्यिकांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, या दृष्टीने हिंदी शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याची माहिती जोशी यांनी दिली.विद्यार्थ्यांना हिंदी लिहिता, बोलता, वाचता यावे, हिंदी भाषेची कौशल्य विद्यार्थ्यात विकसित व्हावेत, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याच्या दृष्टीने राष्ट्रभाषा हिंदीचा प्रसार, प्रचार करावा, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष जोशी यांनी केले आहे. राष्ट्रभाषा हिंदी प्रचार समितीकडून शिक्षकांसाठी हिंदी सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे. एकूण पंधरा शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे. शिवाय राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या परीक्षेसाठी शंभरहून अधिक विद्यार्थी असणाऱ्या शाळांनाही प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.(वार्ताहर)हिंदी शिक्षकांना आवाहन रत्नागिरी जिल्हा राष्ट्रभाषा प्रचार समिती रत्नागिरी जिल्हा हिंदी शिक्षक मंडळ महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळ यांच्यातर्फे हिंदी सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्कारासाठी माहिती पाठवावी असे आवाहन अनिलकुमार जोशी यांनी केले आहे. एकूण १५ पुरस्कार दिले जाणार असून राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धाच्या परीक्षेसाठी १०० च्यावर विद्यार्थी संख्येने बसविणाऱ्या शाळा, ग्रामीण भागातील सतत काम करणाऱ्या शाळांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ३० सप्टेंबर रोजी खेड येथे होणार आहे.