शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडी नगरपंचायत त्रिशंकू

By admin | Updated: November 2, 2015 23:58 IST

सत्ता विकास आघाडीकडे : दोडामार्गमध्ये युतीला स्पष्ट बहुमत

वैभववाडी / दोडामार्ग : काँग्रेस आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेच्या वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी संमिश्र कौल दिल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या सत्तेच्या किल्ल्या विकास आघाडीच्या हातात आहेत. तर कसई-दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये शिवसेना-भाजपने १० जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यामुळे येथे युतीचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे.पक्षीय पातळीवर विचार करता वैभववाडीमध्ये काँग्रेस, तर दोडामार्गमध्ये शिवसेना आणि भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला आहे. राष्ट्रवादीला दोडामार्गमध्ये केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. तर मनसेने एक जागा मिळवित नगरपंचायतीत चंचूप्रवेश केला.आमदार नीतेश राणे तीन आठवडे वैभववाडीत ठाण मांडून बसल्यामुळे काँग्रेस पक्षाची पत राखली गेली, तर भाजप व विकास आघाडी दुसऱ्या स्थानावर आहे. शिवसेनेने दोन जागांवर विजय मिळविला आहे. तर राष्ट्रवादी व मनसे भोपळाही फोडू शकले नाहीत. वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीमध्ये एकूण १७ जागांपैकी काँग्रेसला सात, भाजप चार, गाव विकास आघाडी चार, शिवसेना दोन, असे पक्षीय बलाबल राहिले आहे. गाव विकास आघाडीतील बिनविरोध निवडून आलेल्या रवींद्र रावराणे यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांची संख्या आठ झाली आहे. तर कसई-दोडामार्गमध्ये १७ जागांपैकी सेना व भाजपचे प्रत्येकी पाच, काँग्रेस चार, राष्ट्रवादी दोन आणि मनसे एक, असे पक्षीय बलाबल आहे. विजयी उमेदवार गायब?विकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेला एक नगरसेवक रविवारी रात्रीपासून अज्ञातवासात गेल्याची शहरात जोरदार चर्चा आहे. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या गाडीतून तो गेल्याचे बोलले जाते. त्याच्याशी संपर्क होत नसल्याने नगरपंचायतीच्या सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा परिसरात होत आहे.