शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत

By admin | Updated: October 20, 2015 00:19 IST

चारजण बिनविरोध

वैभववाडी/ दोडामार्ग : वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी १३ जणांनी माघार घेतली. त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या संख्येत दोन जागांची भर पडली आहे. प्रभाग ३ मधून उत्तम कौराजी मुरमुरे (काँग्रेस) व प्रभाग १६ मधून सुचित्रा रत्नाकर कदम (विकास आघाडी) बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये विकास आघाडी २, भाजप आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एक उमेदवाराचा समावेश आहे. भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही नगरपंचायतीत खाते उघडले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची या निवडणुकीत आघाडी होऊ शकलेली नाही. तर दोडामार्ग नगरपंचायतीसाठी १७ जागांसाठी ५५ उमेदवारी अर्जांपैकी ४८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. वैभववाडी नगरपंचायतीसाठी छाननीमध्ये प्रभाग क्रमांक ७ मधील काँग्रेसच्या उमेदवार मयुरी नाना तांबे हिचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरल्याने भाजपच्या सुप्रिया राजन तांबे बिनविरोध निवडून आल्या. त्यानंतर प्रभाग क्रमांक १५ मधून पाचजणांनी माघार घेतल्याने विकास आघाडीचे रविंद्र ऊर्फ बाबू रावराणे बिनविरोध निवडून आले आहेत. १३ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणातनामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी प्रभाग १ - सुनील रामचंद्र रावराणे, रविंद्र सदाशिव रावराणे, प्रभाग ३ - कोंडिबा काळे, प्रभाग ५ - विवेक सज्जन रावराणे, डॉ. राजेंद्र सीताराम पाताडे, गुलाबराव शांताराम चव्हाण, प्रभाग ६ - जागृती समाधान रावराणे, प्रभाग ९ - उषा नामदेव गवळी, प्रभाग ११ - विवेक सज्जन रावराणे, प्रभाग १२ - विद्या सज्जन रावराणे, ऋतुजा रवींद्र भोवळ, प्रभाग १४ - समाधान मनोहर तांबे, प्रभाग १६ - सुचिता सुरेश करकोटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे १३ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोडामार्गात ६ जणांची माघार कसई दोडामार्ग नगर पंचायतीच्या १७ जागांसाठी दाखल झालेल्या ५५ उमेदवारी अर्जांपैकी सहा उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर आरपीआयचे गणपती जाधव यांचा अर्ज दुबार असल्याने तो बाद करण्यात आला. त्यामुळे निवडणुकीच्या रिंंगणात ४८ उमेदवार राहिले असून, यामध्ये काँग्रेस १०, राष्ट्रवादी ७, भाजप ९, शिवसेना ८, मनसे ४, आरपीआय १ तर अपक्षांच्या ९ अर्जांचा समावेश आहे. १७ पैकी ४ प्रभागात चौरंगी, ७ प्रभागात दुरंगी, तर ६ प्रभागात तिरंगी लढत होणार आहे.