शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाचा अतिवापर सर्वांसाठी घातक

By admin | Updated: December 7, 2015 00:16 IST

बाबासाहेब राशिनकर : शृंगारतळीतील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रतिकृती; जनजागृतीची मोहीम हाती

शृंगारतळी : सोशल मीडिया समाजासाठी वरदान, त्याचबरोबर अयोग्य वापरामुळे शाप ठरत असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे. यासाठी गुहागर तालुक्यातील एका शिक्षकाने सोशल मीडियाचा अतिवापर स्वत:साठी व समाजासाठी कसा घातक ठरू शकतो, हे तरूण पिढीला पटवून देण्यासाठी जनजागृती मोहीम सुरु केली आहे.फेसबुक, व्हॉट्सअप, टिष्ट्वटर, गुगल, हाईक, युट्यूब या व अशा सार्वजनिक तंत्राच्या अतिवापरामुळे नातेसंबंधात कसा दुरावा निर्माण होत चालला आहे. हे प्रयोगातून मांडण्याचा प्रयत्न हेदवी येथील प्राथमिक शिक्षक बाबासाहेब राशिनकर यांनी शृंगारतळी येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात केला आहे.या प्रदर्शनाला अनेकांनी भेटी दिल्या आहेत. मोबाईलचा वापर जेवढा चांगल्या कामासाठी होत आहे, त्या प्रमाणात अतिवापरामुळे नुकसानही होत चालले असल्याचे ओरडून सांगण्याचा प्रयत्न गेल्या दोन वर्षांपासून जनजागृतीच्या माध्यमातून हेदवी येथील प्राथमिक शिक्षक करत आहे. त्याच अनुषंगाने विज्ञान प्रदर्शनात जनजागृतीच्या उद्देशाने प्रकल्पाची मांडणी केली होती, असे शिक्षक राशिनकर यांनी सांगितले. देशभरात २१ कोटी लोक नेट वापरतात, तर १३ कोटी मुले कायम आॅनलाईन असतात, त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातही याचा दुष्परिणाम जाणवू लागला आहे. मोबाईलच्या वापरामुळे अनेकांचे अपघात होऊन प्राणहानी होत आहे. सोशल मीडियामुळे सायबर क्राईम वाढले आहे. तरूणाईत खोट्या प्रतिष्ठेसाठी महागडे स्मार्ट फोन खरेदी करण्याची चढाओढ लागली आहे. महागडा फोन हातात असला तर इज्जत वाढते, अशी मानसिकता तरूणाईत निर्माण झाली आहे. काही ठिकाणी कर्ज काढून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महागडे मोबाईल खरेदी केलेली आहेत. मोबाईल ही गरज नसून, प्रतिष्ठेची वस्तू बनली आहे. सोशल नेटवर्किंगमुळे तरूणाई मोबाईलमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण होत चालला आहे. त्याप्रमाणे वेगवेगळे कार्टुन, हिंसक संगणक गेम यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होत चालला आहे. लहान मुले शारीरिक खेळापासून दुरावत चालली आहेत, अशा प्रकारच्या समस्या त्यांनी मांडल्या. (वार्ताहर)