शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

धनगरवाड्यांसाठी पाण्याची गैरसोयच..

By admin | Updated: June 9, 2015 00:10 IST

चिपळूण तालुका : ४० लाख रूपये खर्च करून राबविलेली योजना निकृष्ट

अडरे : चिपळूण तालुक्यातील तळसर, अनारी, कुडप व डेरवण येथील धनगरवाड्यांकरिता भारत निर्माण योजनेअंतर्गत सुमारे ४० लाख रुपये खर्च करुन नळपाणी योजना राबवण्यात आली. या नळपाणी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, अंदाज पत्रकाप्रमाणे काम न केल्याने या योजनेची सखोल चौकशी करुन कारवाई करावी, अन्यथा ग्रामविकासमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश राजेशिर्के, उपसरपंच दत्ताराम राजेशिर्के, सखाराम ढेबे, बाबू बोडेकर, भाऊ हिरवे, धोंडू खरात, रामचंद्र बावदाने, यशवंत वरक, संतोष बावदाने, चंद्रकांत कोकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. चिपळूण तालुक्यातील चार धनगरवाड्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळपाणी योजना राबवूनही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. भारत निर्माण योजनेअंतर्गत चार गावातील धनगरवाड्यांसाठी नळपाणी योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. याचे उद्घाटनही करण्यात आले होते. मात्र, अल्पावधीतच ही योजना अयशस्वी ठरली असून, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. ही नळपाणी योजना भारत निर्माण योजनेअंतर्गत संयुक्त कमिटीने तळसर, अनारी, कुडप, डेरवण राजवाडी धरणातून पाणी उचलून राबविण्यात आली. १६ एप्रिल २००९ला कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. आॅगस्ट २०१० पर्यंत हे काम पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु, ३ वर्ष हे काम उशिरा करण्यात आले. या योजनेबाबत १ जूनला ग्रामस्थांनी उपोषण करण्याचे ठरवले होते. मात्र, पंचायत समिती ग्रामीण पुरवठा विभागाचे जंगम यांच्याबरोबर ग्रामस्थ व ठेकेदार यांची चर्चा करण्यात आली. या नळपाणी योजनेसाठी पाईपलाईन खोदकामासाठी २ लाख १७ हजारचे बिल अदा केले आहे. २ हजार ४०० मीटर लांबी, २ बाय २ ची खोदाई केली आहे. अंदाज पत्रकाप्रमाणे काम करण्यात आलेले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत शासकीयस्तरावर सखोल चौकशी करण्यासाठी त्रीस्तरीय समिती नेमावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. लाखो रूपये खर्च करून नळपाणी योजना गावात राबवल्या जातात. मात्र, योजनेचे काम करताना ते सुयोग्य पध्दतीने केले नाही तर अशा योजनांचा बोजवारा उडतो हे अशा प्रकारातून सिध्द होते आहे. संबंधित योजनेतील संबंधितांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (वार्ताहर)तळसर, अनारी, कुडप व डेरवण नळपाणी योजनेची शासकीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी.अंदाज पत्रकाप्रमाणे काम न केल्याचा तळसर भागातील ग्रामस्थांचा आरोप. चिपळूण तालुक्यातील चार धनगरवाड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्यास कोण जबाबदार.