शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
7
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
8
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
9
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: November 1, 2015 00:05 IST

दुचाकीवरील मुलगीही जखमी : पोलिसांत गुन्हा दाखल, पावशीतील घटना

 कुडाळ : तालुक्यातील पावशी-केसरकरवाडी येथील वळणदार रस्त्यावर एसटी बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार संतोष सावंत (वय ४५) हा तरूण जागीच ठार झाला. त्याच्या मागे बसलेली मुलगी जखमी झाली. एसटी बसचालकाच्या बेपवाईमुळेच हा अपघात झाल्याचे सांगत लोकांनी एसटी चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी चालकांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेह जाग्यावरून हालविणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने येथील वातावरण तणावपूर्ण झाले होते. मूळ आवळेगाव-वरचीवाडी येथील संतोष सावंत हे आंबडगाव-टाळंबा येथे ड्रायव्हर या पदावर नोकरीला असून, ते पत्नी व मुलीसोबत टाळंबा कॉलनीत राहत होते. त्यांची मुलगी कुडाळ येथे नववीत शिक्षण घेत आहे. शनिवारी सकाळी ते मुलीला कुडाळ येथे शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होते. सव्वासातच्या सुमारास ते केसरकरवाडी येथील वळणदार रस्त्यावर आले असताना समोरून येणाऱ्या कुडाळ-केरवडे एसटी बसची त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक बसली व गटारात फेकली गेली. संतोष सावंत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)