शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५२ पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या

By admin | Updated: May 29, 2014 00:37 IST

४८ जणांना बढत्या : पोलीस अधीक्षकांची माहिती

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग पोलीस दलातील एकाच जागी सहा वर्षे कार्यरत असलेल्या ५२ पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, तर ४८ जणांना बढत्या देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी आज, बुधवारी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार प्रथमत: एकाच जागी दोन वर्षे कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. मात्र, शासनाने याबाबत फेरनिर्णय घेत सहा वर्षे एका जागी कार्यरत असलेल्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता नव्याने बदली प्रक्रिया राबवून सहा वर्षे झालेल्या ५२ पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, तर नऊ जणांना सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी, २३ जणांना पोलीस नाईकपदी, १६ जणांना हवालदारपदी अशा एकूण ४८ जणांना बढत्या देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी दिली. ६ जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील ५१ रिक्त जागांसाठी ६ जूनपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात आले होते. या पोलीस भरतीसाठी १८५५ एवढे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १६९४ अर्ज पात्र ठरले आहेत. ही पोलीस भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबविण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असून, ही भरती प्रक्रिया ६ जूनपासून १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी दिली. (प्रतिनिधी)