शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
3
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
4
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
5
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
6
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
7
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
8
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
9
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
10
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
11
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
12
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
13
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
14
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
15
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
16
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
17
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
18
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
20
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात वाढ

By admin | Updated: May 31, 2016 00:36 IST

जिल्हा तंबाखू, कॅन्सरमुक्तीसाठी ‘वसुंधरा’चे विशेष अभियान--जागतिक तंबाखू विरोधी दिन विशेष

रजनीकांत कदम -- कुडाळ--संपूर्ण जगात तंबाखूने थैमान घातले असतानाच सिंधुदुर्गातही तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून जास्तीत जास्त जनता ही तंबाखूच्या व्यसनाधीन असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, ही स्थिती बदलण्यासाठी अमेरिका येथील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ज्ञ व जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. अनिल नेरुरकर हे नि:स्वार्थीपणे केवळ सिंधुदुर्ग जिल्हा तंबाखू व कॅन्सरमुक्त व्हावा या उद्देशाने संपूर्ण जिल्ह्यात गेली अनेक वर्षे ‘तंबाखू व्यसन मुक्ती जाणीव व जागृती अभियान’ वसुधंरा विज्ञान केंद्रामार्फत राबवीत असून हेच अभियान महाराष्ट्रभर राबविण्याचाही त्यांचा मानस आहे. ३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून डॉ. नेरुरकर हे सन २०११ पासून दरवर्षी जिल्ह्यात येऊन तंबाखू व्यसनमुक्ती जाणीव व जागृती अभियान नेरूरपार येथील वसुंधरा विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्ह्यात मोफतपणे राबवितात.जिल्हा तंबाखू मुक्त व कॅन्सर मुक्त व्हावा याकरिता डॉ. नेरुरकर यांच्यावतीने वसुंधरा विज्ञान केंद्रातर्फे जिल्ह्यात तंबाखू व्यसनमुक्ती जाणीव व जागृती अभियान सन २०११ पासून आतापर्यंत अविरतपणे सुरू आहे. या सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमाविषयी माहिती- सन २०११-१६ पर्यंत घेण्यात आलेल्या २० (तोंड तपासणी) प्राथमिक कर्करोग मोफत तपासणी शिबिरात आतापर्यंत १ हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यामध्ये ८३ लोक कर्करोगाच्या प्राथमिक अवस्थेत असल्याचे आढळले. या उपक्रमांतर्गत वसुंधरा टाटा आॅन बाईकची सुरुवात ३० सप्टेंबर २०१४ रोजी कुडाळ येथील संत राऊळ महाराज कॉलेजमधून करण्यात आली. आतापर्यंत या उपक्रमाद्वारे आतापर्यंत ५ गावांमध्ये तोंडाची तपासणी शिबिरात ५९४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली तसेच जन^-जागृती करिता ३००० पेक्षा अधिक लोकांना माहिती देण्यात आली. व कर्करोगाच्या प्राथमिक अवस्थेत असलेल्या रुग्णांना उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येते. वसुंधरा विज्ञान केंद्र व मुंबई टाटा हॉस्पिटल च्यावतीने २००१ ते २०१६ पर्यंत साधारणपणे ५५० शाळा व कॉलेजमधील साधारणपणे १ लाख २५ हजार मुलांना तंबाखू व्यसनमुक्ती व कॅन्सरमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. नेरूरकरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अभियानात डॉ. वैशाली पडते, सतीश मदभावे, भरत पालव, नारायण धावडे, महेंद्र दुरेकर, उत्तम कदम, श्रावणी मदभावे, राशी वेंगुर्लेकर, आशा स्वयंसेविका तसेच वसुधंरा विज्ञान केंद्राचे संचालक, पदाधिकारी व कर्मचारी हे ही सहभागी होऊन कार्यरत असतात. कायदा काय सांगतो १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील व्यक्तीस विक्री करणे दंडनीय आहे, बंदिस्त सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणेस मनाई, शैक्षणिक संस्थांच्या (शाळा, महाविद्यालय आदीच्या) १०० मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ सेवनास मनाई, तंबाखूजन्य पदार्थाच्या वेष्टनावर सूचना असणे गरजेचे (पहिल्यांदा २ वर्षांपर्यंत कारावास किंवा १ हजार रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्ही. दुसऱ्यांदा/ नंतर ५ वर्षांनंतर कारावास व ५ हजारपर्यंत दंड), तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी. (पहिल्यांदा २ वर्षांपर्यंत कारावास किंवा १ हजार रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही. दुसऱ्यांदा/नंतर ५ वर्षांनंतर कारावास आणि ५ हजारपर्यंत दंड. तंबाखू सेवनाचे दुष्परिणामतोंडाचा कॅन्सर, मोतीबिंदू, घशाचा कॅन्सर, निकोटिनच्या प्रभावामुळे मेंदूचे कार्य मंदावते, अन्ननलिकेचा कॅन्सर, फुफ्फुस कॅन्सर, श्वासाचा त्रास, यकृताचा कॅन्सर, हृदयविकार, पोटाचा अल्सर, पोटाचा कॅन्सर, नपुंसकत्व, रक्त न पोहोचल्याने हाताची बोटे गळून पडणे, रक्तवाहिन्या संकुलित पावणे, वाढती पाय दुखणी, कार्यक्षमता मंदावणे. तसेच तोंडाला दुर्गंधी, दातांच्या समस्या, दात सडणे, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशय आदी सर्व ठिकाणी कॅन्सर होऊ शकतो.