शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावर तिकीटांचा काळाबाजार कुडाळमधील घटना

By admin | Updated: May 25, 2014 01:12 IST

प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना धरले धारेवर

कुडाळ : कुडाळ रेल्वेस्थानकावर तत्काळ तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे प्रवाशांच्या नजरेस आल्यावर प्रवाशांनी याबाबत तेथील रेल्वे पोलिसांना धारेवर धरले. प्रवाशांबरोबर झालेल्या वादानंतर रेल्वे पोलिसाने यापुढे योग्य काळजी घेण्याचे मान्य केल्यावर संतप्त प्रवासी शांत झाले. सध्या जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांना परतीचे वेध लागले आहेत. मोठ्या प्रमाणात चाकरमानी रेल्वेने परत जात आहेत. आपला प्रवास गर्दीशिवाय व सुखरूप व्हावा, याकरिता रेल्वेची तत्काळ तिकीट काढण्यासाठी त्यांची लगबग सुरू असते. याचप्रकारे कुडाळ रेल्वेस्थानकावरदेखील तत्काळ तिकिटांमधून आपल्याला आरक्षण मिळावे, म्हणून हे चाकरमानी पहाटेच दाखल होतात. परंतु पहाटे आलेल्या चाकरमान्यांचाही हिरमोड होतो. कारण कुडाळच्या ह्या तिकिट घरामध्ये अगोदरच कुणीतरी तिकिटांसाठी रात्रीपासूनच रांगा लावलेल्या असतात. याबाबत अज्ञाताने अर्ज करून स्थानकावर तिकिटांचा काळा बाजार होत असल्याची तक्र ार केली होती. त्यामुळे कणकवली येथून शनिवारी सकाळी एक रेल्वे पोलीस कुडाळ रेल्वेस्थानकावर पाठविण्यात आला होता. प्रवाशांच्या तक्रारी याठिकाणी काहीजण स्वत:साठी नाहीत, तर जादा पैसे घेऊन दुसर्‍यांची तिकिटे काढून देतात. रात्री एक आणि सकाळी दुसरा माणूस या ठिकाणी रांगेत उभा असतो परंतु ती व्यक्ती रेल्वे प्रवास करणारी नसते. कणकवलीहून आलेल्या रेल्वे पोलिसाने संबंधित सर्वांची ओळखपत्रे तपासण्यास सुरुवात केली. यावेळी रांगेतील काहीजणांनी आमची ओळखपत्रे तुम्ही तपासू शकत नाही, असे सांगितले. तर काहींनी सर्वांची ओळखपत्रे तपासा व ज्यांचा प्रवाशांशी काहीही संबंध नाही, अशांना बाहेर काढा, असे सांगितले. त्यामुळे काहीवेळ बाचाबाची झाली होती. यावेळी वातावरण तंग बनल्याने एकटा रेल्वे पोलीस पुरता हैराण झाला होता. त्याला तिकीट काढण्यासाठी आलेल्या काही प्रवाशांनी धारेवर धरले. कुडाळात रेल्वे पोलीस नाही काही लोकांनी आणखी पोलीस नाहीत का, अशी विचारणा केली असता त्या पोलिसाने, कुडाळात पोलीस नाहीत. मला कणकवलीहून पाठविले आहे, असे सांगितले. त्यामुळे कुडाळसारख्या मध्यवर्ती ठिकाणच्या गजबजलेल्या रेल्वेस्थानकावर कायमस्वरूपी रेल्वे पोलीस नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. आम्ही उद्यापासून या ठिकाणी योग्य ती काळजी घेऊ. तसेच दररोज तिकिटे काढण्यासाठी आलेल्यांना योग्यप्रकारे शहानिशा करून मगच तिकिटे काढण्यासाठी देऊ, असे सांगितले. एकंदरीत पाहता, रेल्वेस्थानकावर दलालांच्या तत्काळ तिकिटांच्या काळाबाजार करण्याच्या उद्योग जोरदार सुरू झाला असून यावर मात्र प्रशासनाचा कोणताही अंकुश नसल्याचे दिसून येते. नियमात तिकिटे काढणार्‍यांना मात्र याचा फटका बसत आहे. (प्रतिनिधी)