शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

तिघांचे नामनिर्देशन दाखल

By admin | Updated: July 12, 2014 00:22 IST

मालवण नगराध्यक्ष निवडणूक : तिघांचेही अर्ज वैध

मालवण : मालवण नगरपरिषदेच्या १७ रोजी होऊ घातलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी काँग्रेसकडून नगरसेवक अशोक तोडणकर आणि दीपक पाटकर या दोघांनी तर शहर विकास आघाडीच्यावतीने नगरसेवक महेश जावकर यांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली. अर्ज छाननीत तिघांचेही अर्ज वैध ठरले. १६ जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जून ते नोव्हेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुका न घेण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र शासनाच्या या आदेशाला मंत्रीमंडळानेच आक्षेप घेत हा निर्णय रद्दबातल ठरविला होता. त्यामुळे या निवडणुका घेण्याचे फेरआदेश देण्यात आले आहेत. मालवण नगरपालिकेतील नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्या अडीच वर्षांचा कालावधी संपत आल्याने १७ रोजी नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून नगरसेवक अशोक तोडणकर व दीपक पाटकर यांनी अर्ज दाखल केला. अशोक तोडणकर यांच्या अर्जाला सूचक म्हणून नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व अनुमोदक म्हणून नगरसेविका संतोषी कांदळकर यांनी सह्या केल्या. नगरसेवक दीपक पाटकर यांना सूचक म्हणून नगरसेवक मंदार केणी व अनुमोदक म्हणून ममता वराडकर यांनी सह्या केल्या. मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडे नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळू कोळंबकर, नगरसेवक जॉन नऱ्होना, मंदार केणी, दीपक पाटकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, संतोष कांदळकर, हेमंत तोडणकर, स्रेहा आचरेकर, माजी उपनगराध्यक्ष सुहास हडकर आदी उपस्थित होते.शहर विकास आघाडीच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी नगराध्यक्ष निवडीसाठी नामनिर्देशन पत्र सादर केले. यावेळी आघाडीचे गटनेते रविकिरण आपटे, नगरसेवक नितीन वाळके, नगरसेविका पूजा करलकर, दर्शना कासवकर, शिला गिरकर, रेजिना डिसोजा, सेजल परब, मनोज मोंडकर, आगोसिन डिसोजा आदी उपस्थित होते. अर्ज दाखल करून घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांनी तीनही अर्जाची छाननी केली. यानंतर तीनही अर्ज वैध असल्याचे त्यांनी जाहीरकेले. (प्रतिनिधी)