शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील चित्रफीत पसरवण्याची धमकी

By admin | Updated: June 9, 2015 00:59 IST

सकाळी तक्रार, सायंकाळी माघार : दोडामार्ग तालुक्यातील प्रकार; युवतीने लग्नास नकार दिल्याने प्रेमवीराचे कृत्य

सावंतवाडी : फेसबुकवरून झालेली मैत्री, प्रेम व नंतर धोका अशा त्रिकोणात सापडलेल्या एका युवतीला जेव्हा दोन्ही प्रेमवीरांकडून अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी मिळते, तेव्हा मात्र ती युवती पोलिसांचे दार ठोठावते. मात्र, सकाळी केलेली तक्रार तिने सायंकाळी माघार घेतल्यानंतर या गौडबंगालची चर्चा तालुक्यात आजचा विषय बनून राहिली. दोडामार्ग तालुक्यातील युवती मुंबई येथे आपल्या नातेवाइकांकडे राहत होती. यावेळी तिची फेसबुकवरून तालुक्यातील एका गावातील युवकाशी ओळख झाली. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यावेळी ते दोघेही मुंबईतील अनेक ठिकाणी फिरायलाही गेले होते; पण नंतर या युवकाला त्या युवतीने टाळण्याचा प्रयत्न केला. याचा राग मनात धरून तो युवक तिला सतत धमकावत होता. याच काळात त्या युवतीची ओळख सावंतवाडी तालुक्यातील एका गावातील युवकाशी झाली. ही ओळख फेसबुकवरूनच झाली होती. दोघेही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार होते. मात्र, याची माहिती पहिल्या युवकाला समजली. त्याने दुसऱ्या युवकाची भेट घेत ‘तू तिच्याशी लग्न करू नकोस, माझे व तिचे पहिले प्रेम आहे’, असे सांगितले. तसेच तू लग्न करण्याचा निर्णय घेतला, तर मी तिची अश्लील चित्रफीत प्रसारित करेन, अशी धमकीही त्याने दिली होती. यानंतर मात्र दुसऱ्या युवकाने त्या युवतीसोबत लग्न करण्यास टाळाटाळ केली. आपले लग्न मोडले. त्याशिवाय बदनामीही झाली, यामुळे त्या युवतीने थेट सावंतवाडी पोलीस ठाणे गाठत झालेला प्रकार पोलिसांजवळ कथन केला. तसेच पोलिसांनी याबाबत तक्रारही नोंदविली. आपली तसेच गावाची बदनामी होईल या भीतीने संबंधित युवतीच्या आई व वडिलांनी ही तक्रार मागे घेतली. सकाळी तक्रार दिली, तर सायंकाळी तक्रार मागे घेतल्याने सर्वजण आश्चर्यचकीत झाले. (प्रतिनिधी)युवतीवर दबाव की पोलिसांवर?घटनेची कुणकुण लागताच कोलगाव येथील राजकीय पदाधिकारी पोलीस ठाण्यात गोळा झाले होते. त्यामुळे हे राजकीय पदाधिकारी युवतीवर दबाव आणण्यासाठी गोळा झाले होते की पोलिसांवर, याची चर्चा उशिरापर्यंत पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू होती.तक्रार असती तर कारवाई नक्कीच केली असती : वेडेआमच्याकडे प्रथम युवतीने तक्रार दिली होती. मात्र, तिने ती तक्रार नंतर मागे घेतली. याचे नेमके कारण आम्हाला कळले नाही. तिने तक्रार दिली असती, तर नक्की कारवाई केली असती, असे पोलीस उपनिरीक्षक दिलीप वेडे यांनी सांगितले.