नांदगांव : औरंगाबाद येथे झालेल्या ४२ व्या महाराष्ट्र राज्य सीनिअर ज्यूदो चॅम्पियनशिप स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याकडून खेळताना कासार्डेचा ज्यूदोपट्टू रूपेश कानसे याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला.या स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ५ खेळाडू सहभागी झाले होते. ९० किलो वजनी गटातून खेळताना रूपेश कानसे याने कांस्यपदक पटकावले.याशिवाय अभिजित शेट्ये, केतन सावंत, भारती राठोड यांनाही राज्यस्तरीय प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या यशस्वी खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कुलकर्णी, सचिव दत्तात्रय मारकड, काँग्रेसचे युवा नेते संदेश पारकर, सिंधुरत्न फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी, कासार्डे विकास मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.सर्वांना प्रशिक्षक दत्तात्रय मारकड, राकेश मुणगेकर, सिद्धेश माईणकर, नीळकंठ शेट्ये यांचे मार्गदर्शन लाभले. रूपेश कानसे याने यापूर्वीही बॉक्सिंग, शिकई मार्शल आटर््स, कराटे स्पर्धेतही राज्यस्तरावर पदके मिळविली आहेत. (वार्ताहर)
ज्यूदो स्पर्धेत कानसे राज्यात तिसरा
By admin | Updated: December 29, 2014 00:01 IST