शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

द्वेष करणाऱ्यांकडून लाडाची अपेक्षा नाही

By admin | Updated: November 1, 2015 00:12 IST

परुळेकर : अधिकाऱ्यांकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा घेतला समाचार

सिंधुदुर्गनगरी : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अहवाल बंद आंदोलन सुरू केल्यामुळेच शासनाच्या तिजोरीतून मानधनाचा निधी बाहेर पडला. गेली अनेक वर्षे ज्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा द्वेषच केला ते आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लाड काय करणार? असा सवाल अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेत्या कमलताई परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे. गुरुवारी पार पडलेल्या महिला व बालविकास समिती सभेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या थकीत मानधनाविषयीच्या चर्चेत महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी माहिती देताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आॅगस्टपर्यंतचे सर्व मानधन वितरित केले आहे. तरीही जोपर्यंत मानधन खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत मासिक प्रगती अहवाल दिला जाणार नाही, असे संघटनेच्या जोरावर त्यांच्याकडून अडेलतट्टू धोरण अवलंबिले जात आहे, असा आरोप केला. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अती लाड झाले असल्याचेही यावेळी म्हटले होते. दोन दिवसांत मासिक प्रगती अहवाल सादर न केल्यास कारवाईचा बडगा उगारावा लागेल, असा इशाराही यावेळी सभापती स्नेहलता चोरगे यांनी दिला होता. याबाबत शुक्रवारी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेत्या कमलताई परुळेकर यांनी म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अहवाल बंद आंदोलन पुकारल्यामुळेच शासनाच्या तिजोरीतून मानधनाचा निधी बाहेर पडला. ज्या अधिकाऱ्यांनी आणि समितीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा गेली अनेक वर्षे द्वेषच केला ते दगडाची हृदये असलेले अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लाड काय करणार? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. चार महिने मानधन नसतानाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपले घर कसे चालविले याची ज्यांना जाणीव नाही, ते कर्मचाऱ्यांचे लाड काय करणार त्यासाठी मुळात प्रेम असावे लागते. त्यामुळे नेहमी द्वेष करणाऱ्यांकडून लाड करण्याची अपेक्षा कोण ठेवेल? असाही प्रश्न उपस्थित केला आहे. महिला व बालविकास समितीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची भाषा करण्यापेक्षा त्यांना वेळेत मानधन कसे मिळेल, दोन वर्षांची प्रवास बिले कशी मिळतील, याकडे लक्ष द्यावे. नाहक कारवाईच्या धमक्या दाखवू नयेत असेही पत्रकातून सूचित केले आहे. (प्रतिनिधी)