शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
2
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
3
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
4
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
5
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
6
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
7
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
8
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
9
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
10
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
11
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
12
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
13
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
14
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
15
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
16
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
17
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
18
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
19
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
20
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन

जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच

By admin | Updated: December 20, 2014 23:25 IST

चोराना पकडण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरुच असून घरफोडी, शाळा, दुकाने, बंगले इतकेच नाही तर आता देवळातील फंडपेटी चोरीचे प्रकारही सुरु झाले आहेत. कसाल बाजारपेठ येथील गजबजलेल्या ठिकाणी शुक्रवारी रात्री सिद्धीविनायक मंदिरामधील फंडपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली व त्यातील रक्कम चोरून नेली. त्यामुळे चोरांच्या टोळ्यांना पकडण्यासाठी ओरोस पोलिसांसमोर मोठे आव्हान पुन्हा उभे ठाकले आहे.कसाल बाजारपेठ येथे गजबजलेल्या ठिकाणी सिद्धीविनायक मंदिर आहे. त्यामुळे कसालच्या परिसरात रात्री १० ते ११ वाजेपर्यंत गाड्यांची वर्दळ असते. ओरोसच्या परिसरात गेल्या चार महिन्यांमध्ये चोरीचे प्रमाण वाढले असून आता चोरटे देवळातील फंडपेटी चोरी करू लागले आहेत.काही ठिकाणी पोलिसांना चोर पकडण्यात यश आले आहे. काही ठिकाणी चोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळत आहेत. कसालच्या बाजारपेठेतील सिद्धीविनायक मंदिर गजबजलेल्या परिसरात असून आजूबाजूला घरे आहेत. चोरट्यांनी रात्रीच्यावेळी चोरी केल्याचे निष्पन्न होत आहे. देवळाच्या आजूबाजूला ग्रीलचे आवरण आहे. दरम्यान श्वानपथकाला पाचारण केले होते.सिंधुदुर्ग अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी दोनच दिवसांपूर्वी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले की आपण ज्या परिसरात रहात आहोत तेथे येणाऱ्या भाडेकरूंची माहिती घरमालकांनी आपल्या माहितीसाठी ठेवावी. त्यामध्ये नाव, गाव, फोटो, फोन नंबर, मूळ गाव आदी येणाऱ्या भाडेकरूची पूर्ण माहिती घरमालकाला असणे महत्वाचे आहे.दरम्यान, सिंंधुदुर्ग जिल्ह्यात घरफोडी, चोरीचे प्रकार जास्त प्रमाणात वाढले आहेत. सिंधुदुर्गनगरी परिसरात गुन्ह्यांचे प्रकार वाढले असून ओरोस पोलीस स्टेशनच्या पोलिसांची यामध्ये उदासिनता दिसत आहे. पोलीस कर्मचारी रात्रीची गस्त घालण्यात रस्त्यावर ट्रक, टेंपो, मोटारसायकल अडविण्यात मग्न असतात. मात्र, असे असले तरी ठिकठिकाणी चोरीच सत्र सुरूच आहे. (वार्ताहर)