शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
4
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
7
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
8
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
9
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
10
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
11
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
12
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
14
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
15
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
16
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
17
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
18
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
19
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द

राष्ट्रवादीचे थाळीनाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2015 00:27 IST

तहसीलदारांना निवेदन : कुडाळातील तहसील कार्यालय परिसर घोषणांनी दुमदुमला

कुडाळ : ‘गली गली मे शोर है युती सरकार चोर है, युती सरकार हाय हाय, फडणवीस सरकार हाय हाय’ अशा घोषणांनी व थाळीनाद आंदोलनाने कुडाळ तहसील कार्यालयाचा परिसर सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दणाणून सोडला. यावेळी निवेदन प्रभारी तहसीलदार यांना दिले. युती सरकारला एक वर्ष पूर्ण होत असून, सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. जनतेच्या समस्यांचे, प्रश्नांचे निराकारण केले नाही. महागाई वाढवून व इतर अनेक प्रश्न निर्माण करून या युती सरकारने जनतेला अच्छे दिन दाखविण्यापेक्षा बुरे दिन दाखविण्यास सुरुवात केली आहे, असे आरोप करीत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने व शासनाला जागे करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने कुडाळ तहसील कार्यालय येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, युवकचे प्रदेश सरचिटणीस अबीद नाईक, प्रांतिक सदस्य अमित सामंत, राष्ट्रवादी कुडाळ तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर, उपसभापती आर. के. सावंत, जिल्हा बँक संचालक प्रमोद धुरी, आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या थाळीनाद आंदोलनामध्ये राष्ट्रवादीच्यावतीने मोठ्या प्रमाणात थाळीनाद तसेच शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणांनी कुडाळ परिसर दणाणून गेला होता. (प्रतिनिधी)