शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन सुरूच ठाकर समाज : आजपासून तीव्र होणार

By admin | Updated: August 14, 2014 22:41 IST

आमरण उपोषण आणि मुंडण आंदोलन छेडण्यात येणार

सिंधुदुर्गनगरी : ठाकर समाजाला अनुसूचित जमाती म्हणून प्रमाणपत्र मिळावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा होऊनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने ठाकर बांधवांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे. तर १५ आॅगस्टपासून हे आंदोलन अधिक तीव्र करत आमरण उपोषण आणि मुंडण आंदोलन छेडण्यात येणार आहे.ठाकर समाजाला अनुसूचित जमाती (एस. टी.) आरक्षणाच्या सवलती मिळाव्यात या मागणीसाठी ठाकर समाजबांधवांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर साखळी उपोषण सुरु केले आहे. गुरुवारी चौथ्या दिवशी उपोषण सुरु आहे तर १५ आॅगस्ट रोजी शासनाचा निषेध करण्यासाठी ठाकर बांधव मुंडण करणार आहेत. तसेच आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत.ठाकर समाज (एस.टी.) आरक्षण कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पालकमंत्री नारायण राणे यांच्याशी आपल्या मागणीबाबत चर्चा केली. त्यांनी मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतली असली तरी जोपर्यंत प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहील. केवळ आश्वासनावर आमचे आता समाधान होणार नाही. कारण यापूर्वी अनेकदा अशी आश्वासने मिळाली होती. मात्र, अद्याप पूर्तता झालेली नाही. तरी जोपर्यंत अनुसूचित जमाती म्हणून प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असा निर्धार केला आहे. तर हे आंदोलन १५ आॅगस्ट रोजी अधिक तीव्र करून साखळी उपोषणाचे रुपांतर आमरण उपोषणात करण्यात येणार आहे. तर शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी बहुसंख्य ठाकर बांधव आपले मुंडण करून घेतील अशी माहिती आंदोलनकर्त्या ठाकर बांधवांनी दिली. (प्रतिनिधी)