शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीयांमुळे स्थानिकांची उपासमार!

By admin | Updated: September 11, 2015 22:06 IST

तुषार पाळेकर : परप्रांतीय नौकांचे मत्स्यसाठ्यावर आक्रमण; ‘ती’ जाळी शासनास परत करा

देवगड : शासन युएनडीपीमार्फत मच्छिमारांना शाश्वत मच्छिमारी आणि संवर्धन याबाबतचे धडे देत असताना त्याची अंमलबजावणी स्थानिक मच्छिमार करतात; परंतु यामधून निर्माण होणारा मत्स्यसाठा मात्र, परप्रांतीय नौका अतिक्रमण करून लुटून नेतात. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक मच्छिमार हैराण झाले आहेत. त्याच्यावर मत्स्योत्पादन घटल्याने उपासमारीची वेळ आली आहे. युएनडीपीमार्फत मच्छिमारांना १९ आॅगस्ट रोजी देण्यात आलेली जाळी शासनास परत करावी, अशा मन:स्थितीत मच्छिमार आहेत. ज्यांना ही जाळी मिळाली आहे त्यांनी ती शासनास परत करावी, असे आवाहन देवगड तालुका युवा मच्छिमार नेते तुषार पाळेकर यांनी केले आहे.पाळेकर यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, युएनडीपीमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांना शाश्वत मासेमारी व मत्स्यसंवर्धन याबाबत माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली जाते. या माहितीद्वारे जिल्ह्यातील मच्छिमार शाश्वत मच्छिमारी करतात. जेणेकरून मत्स्यसाठा मोठ्या प्रमाणात वाढेल व मत्स्यनिर्मिती मोठ्या प्रमाणात होऊन येथील स्थानिक मच्छिमार आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो. परंतु, गेली ७ ते ८ वर्षे या जिल्ह्यात परप्रांतीय मच्छिमार महाराष्ट्राच्या ७२0 किलोमीटर सागरी हद्दीत १२ नॉटीकल मैल आत येऊन बेकायदेशीर मासेमारी करीत असल्याने येथील मत्स्यसाठा संपुष्टात येत आहे. त्याबरोबर मत्स्योत्पादन घटत असल्याने मत्स्यसाठा निर्मिती न होता स्थानिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)परप्रांतीयांचा धुमाकूळ सुरूचसागरी हद्दीत अतिक्रमण करणाऱ्या या परप्रांतीय नौका हायस्पीड ४00 ते ५00 हॉर्सपॉवर असून, छोट्या पारपंरिक मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात जाळ््यांचे नुकसान करीत आहेत. यासंदर्भात प्रत्यक्षात जाब विचारला असता त्या परप्रांतीय नौकांवरील खलाशी वर्गाकडून छोट्या मच्छिमारांवर वारंवार हल्ले होऊन मारहाण झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या नौकांबाबत संबंधित विभागाकडे तक्रार करूनही त्यांचा धुमाकूळ हा किनारपट्टीवर सुरूच आहे. जिल्ह्यातील मच्छिमार सक्षमपरप्रांतीय नौकांची तपासणी केली असता नौका परवान्यातील नमूद इंजिन प्रकार, इंजिन क्षमता व प्रत्यक्ष नौकेवरील इंजिन, आदी क्षमता यातही तफावत आढळून येत आहे. या नौकांचा त्रास असाच सुरू राहिल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मच्छिमार परप्रांतीयांचे आक्रमण परतविण्यास सक्षम आहेत, असेही तुषार पाळेकर यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.