शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

माव्याची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: June 27, 2014 00:53 IST

सावंतवाडीत गुन्हा अन्वेषणची कारवाई

सावंतवाडी : गोव्याहून कोल्हापूर येथे माव्याची वाहतूक करणारा आयशर टेम्पो व ८८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा अन्वेषण व वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी चालकासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोव्यावरून कोल्हापूरला जाणाऱ्या आयशर टेम्पो (एपी २९ टीए १३६०)ला आज, गुरुवारी सकाळी ११.३० वाजता स्थानिक गुन्हा अन्वेषण व वाहतूक पोलिसांनी तपासणीकरिता बोर्डी पुलानजीक थांबविले. या टेम्पोची पाहणी केली असता, गब्बर माव्याचे ६० पाऊचचे ५५ पॅकेट असलेल्या २६ पिशव्या आढळून आल्या. या सर्व मुद्देमालाची किंमत ८८ हजार ८०० रुपये एवढी आहे. यावेळी पोलिसांनी अन्नसुरक्षा अधिकारी दि. रा. शिंदे यांना तपासणीसाठी बोलाविले. गुटखा, पानमसाला व मावा या पदार्थांना बंदी असल्याने टेम्पो पकडण्यात आला. या कारवाईत पाच लाखांचा टेम्पो व ८८ हजार ८०० रुपयांचा मावा, असा मुद्देमाल पकडण्यात आला आहे. यातील टेम्पोचालक मोहम्मद निजामुद्दीन अझिमोद्दीन (वय ३८), सय्यद हुसेन मोहम्मद अली (४५) व अब्दुल वहिद रशीद (४८) यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या जगदीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एस. यादव, बापू खरात, संतोषसावंत, वाहतूक पोलीस चंद्रशेखर मुणगेकर, रविकांत झरकर यांनी केली. (वार्ताहर)