शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

तपासासाठी पथक गोव्याला

By admin | Updated: September 22, 2016 00:40 IST

संदीप मांजरेकर बेपत्ता प्रकरण: गूढ उकलण्याकडे तालुक्याचे लक्ष

कुडाळ : बेपत्ता संदीप मांजरेकरच्या प्रकरणी अधिक तपासासाठी कुडाळ पोलिसांचे एक पथक गोवा राज्यात गेले आहे. यामुळे संदीपला गोव्यात नेमके कुठे ठेवण्यात आले होते? व का? याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. कुडाळ-कुंभारवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व शिवसेनेचे कार्यकर्ते संदीप मांजरेकर १६ सप्टेंबरपासून गूढरित्या बेपत्ता होते. त्यांचा तपास कुडाळ पोलिस गेले चार ते पाच दिवस करीत होते. या दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप व उदयच्या फोनवरील संभाषणानुसार या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले. मंगळवारी दुपारी या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी संदीपला त्याच्या कुडाळ-कुंभारवाडी येथील घरातून ताब्यात घेतले. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार संदीपच्या बेपत्ता कालावधीत संदीपचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी संदीपचा चुलत भाऊ व शिवसेनेचा कार्यकर्ता उदय मांजरेकर (रा. कुंभारवाडी), सुनील पालांडे (रा. नाबरवाडी ), समीर सावंत ( रा. गोवा-चिपी) व संदीप कुंभार (रा. कुंभारवाडी) या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, संदीप कुंभार सोडून इतर तिघेही पोलिस कोठडीत आहेत. गोवा येथे मेडिकल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या समीर सावंत याच्या गोव्यातील थिवी येथील घरी संदीपला बेपत्ता कालावधीत गोवा येथे ठेवण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी अटक असलेल्या समीर सावंत याला घेऊन या प्रकरणी अधिक तपासासाठी बुधवारी सकाळी गोवा गाठले. संदीपला गोव्यात कुठे व किती दिवस ठेवले होते, याचा तपास कुडाळ पोलिसांचे पथक करणार आहे. कुडाळचे पोलिस उपनिरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्त्वाखाली हे पोलिसांचे गोवा येथे पथक गेले आहे.या प्रकरणात संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या उदय, सुनील व समीरची पोलिस कोठडी २२ रोजी पोलिस कोठडी संपत असून, या तिघांनाही गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटून वातावरण तापत असताना संदीपचा शोध लागला. (प्रतिनिधी) चौथ्या संशयिताला अटक होणार या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी संशयित म्हणून चार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये तिघांना अटक केली आहे. तर यातील अटक न झालेल्या संदीप कुंभारला लवकरच अटक करण्यात येणार आहे, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.