शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
4
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
5
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
6
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
9
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
10
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
11
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
12
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
13
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
14
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
15
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
16
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
17
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
18
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
19
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
20
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?

शाळा बंद ठेवत शिक्षकांचा मोर्चा

By admin | Updated: December 12, 2014 23:51 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क कृती समितीच्यावतीने ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ओरोस : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त ठरविल्याने शासन आदेश मागे घ्यावेत या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवत जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी शुक्रवारी ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क कृती समितीच्यावतीने ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांना सादर करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग शिक्षण संस्थाचालक मंडळाचे सचिव जी. एम. सामंत, शिक्षण भारतीचे संजय वेतुरेकर, शिक्षकेत्तर संघटनेचे प्रसाद पडते, अध्यापक संघाचे नारायण माने यांच्यासह सुमारे बाराशेहून अधिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.पटसंख्येचे निकष लावून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविण्याचा घाट शासनाने घातला असल्याने अनेक शाळांमधील शिक्षक कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. हे शिक्षक कमी झाल्यानस विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही परिणाम होणार आहे. शिक्षण हा विद्यार्थ्यांना घटनेने व कायद्याने दिलेला अधिकार आहे. यानुसार त्यांना शिक्षण मिळणे हा अधिकाराचाच एक भाग आहे. ही बाब दुर्लक्षित होत असल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.शासनाने २00७ मधील तरतुदीचे योग्य पालन करुन संच मान्यतेचे निकष नव्याने निश्चित करावेत, तोपर्यंत सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मूळ शाळेतच कार्यरत ठेवावे. तसेच आॅनलाईन आॅफलाईन वेतन काढण्याच्या नवीन धोरणामुळे अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे हक्क तसेच संस्था चालकांची त्यांच्या विद्यालयाची विविध पदे गमवावी लागत आहे. या बाबींकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले आहे.शिक्षक संघटनांनी काढलेल्या मोर्चात जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर हे सामील झाले होते. पेडणेकर यांनी आपण तुमच्या सोबत असल्याचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना यावेळी सांगितले. (वार्ताहर)