शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

‘त्या’ वसतिगृहाचे प्रतिकात्मक उद्घाटन

By admin | Updated: June 27, 2014 01:01 IST

वेंगुर्लेत विद्यार्थिनीच्या हस्ते शुभारंभ : दलित अत्याचार विरोधी संघर्ष समितीचा पुढाकार

वेंगुर्ले : वेंगुर्ले कॅम्प येथील मुलींचे वसतिगृह बांधून तीन वर्षे उलटले तरी समाजकल्याण विभागाकडून याचा शुभारंभ करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थिनींना या वसतिगृहाचा उपयोग होण्यासाठी गुरुवारी दलित अत्याचार विरोधी संघर्ष कृती समितीच्यावतीने वसतिगृहाचे प्रतिकात्मक उद्घाटन विद्यार्थिनी शिल्पा जाधव हिच्याहस्ते करण्यात आले. वेंगुर्ले कॅम्प येथे सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या मागासवर्गीय वसतिगृहाचे पाठपुरावा करुनही गेल्या तीन वर्षात उद्घाटन करण्यात आलेले नाही. सर्व व्यवस्था पूर्ण असतानाही उद्घाटन न केल्याने मागासवर्गीय विद्यार्थिनींचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे दलित अत्याचार विरोधी संघर्ष कृती समितीच्यावतीने राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिवसाचे औचित्य साधून या वसतिगृहाचे प्रतिकात्मक उद्घाटन विद्यार्थिनी शिल्पा जाधव यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे माजी राज्याध्यक्ष महेश परुळेकर, एकनाथ जाधव, मिलींद वेंगुर्लेकर, अमिन हकीम, वामन कांबळे, वासुदेव जाधव, लाडू जाधव, कानू परुळेकर, अ‍ॅड. सुषमा प्रभू खानोलकर, शशांक मराठे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. तसेच शासनाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार न घडण्यासाठी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता. या वसतिगृहात समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश घेता येणार आहे. यासाठी दलित अत्याचार विरोधी संघर्ष कृती समितीचे जिल्हा निमंत्रक महेश परुळेकर, स्वाती तेली यांच्याकडे नावे नोंदवावीत, असे आवाहन शशांक मराठे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)