शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हिरवाईनी नटलेली शेतशिवारे सुनीसुनी

By admin | Updated: May 29, 2015 23:46 IST

वन्यप्राण्यांचा उपद्रव : अवानावर येथील शेतकरी हैराण

सुरेश बागवे - कडावल--कधीकाळी अवानाची हिरवीगार दुलई अंगाखांद्यावर मिरवत कुसगाव-गिरगावमधील शिवारे संथ वाऱ्यासंगे मुक्तपणे डोलायची; परंतु आता चित्र पालटले आहे. अवानावर वन्य प्राण्यांच्या उपद्रवाची गडद छाया निर्माण झाली आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाबरोबरच परडी-परसूही कमी झाल्याने अवान निर्मितीही घटली आणि हिरवाईच्या श्रीमंतीने नटली-सजलेली येथील शेतशिवारे अवानाशिवाय सुनीसुनी दिसू लागली. ‘अवान’ हा शब्द तेव्हा जनमानसात चांगलाच प्रचलित होता. पूर्वी पंचक्रोशीतील बहुतांश शेतकरी उन्हाळी पिकांमध्ये कुळीथ, चवळी, नाचणी, वाल, वांगी तसेच इतर भाजीपाल्यांच्या पिकांबरोबरच मोठ्या प्रमाणात कांदे व मिरचीचे उत्पादन घेत असल्याने अवानाला मोठी मागणी होती. अवान विकत घेऊ इच्छिणारे शेतकरी या पारंपरिक रोपवाटिकेत जाऊन रोपांचा दर्जा पाहून ओळीवरच सौदा पटवून व्यवहार करीत असत, तर अवान रुजविणारे शेतकरी काही वेळा आठवडा बाजारात आपल्या मालाची विक्री करीत. मात्र, हा व्यवहार रोपवाटिकाधारक शेतकऱ्यांना अनेकवेळा अडचणीचा ठरे. कारण बाजारात या बियाण्याच्या रोपांची विक्री झाली नाही, तर त्यांचे मोठे नुकसान होत असे. अवान निर्मितीपासून हंगामी स्वरुपात रोजगार मिळे, तर परिसरातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी चांगल्या दर्जाची रोपे उपलब्ध होत. आसपासच्या कित्येक गावांमधील शेतकरी पूर्वी कुसगाव-गिरगाव येथूनच मिरची, कांद्याचे अवान नेऊन आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असत. अवानामुळे कित्येक शिवारे हिरवीगार होऊन डोलायची. उन्हाळी शेती घटली वन्यप्राण्यांच्या वाढलेल्या उपद्रवाचा परिणाम अवान निर्मितीच्या व्यवसायावर होऊ लागला. रानडुक्कर, माकडे, हरीण, भेकरे, ससे, गवे यासारखे वन्य प्राणी अवानाचे वाफे उद्ध्वस्त करू लागले आणि या व्यवसायाला उतरती कळा लागली. ही समस्या एवढी विकोपाला गेली की, नंतर येथील शेतकऱ्यांनी अवान रुजविण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबविली, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी उन्हाळी शेती करणे थांबविले. उन्हाळी शेतीचे प्रमाण कमी झाल्यामुळे अवानाला मागणीही कमी झाली. अवान नाही, म्हणून उन्हाळी शेती नाही आणि उन्हाळी शेती नाही, म्हणून अवानाची निर्मिती नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली.पारंपरिक व्यवसाय सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या कुसगाव व गिरगाव या गावांमधील शेतकरी उन्हाळी शेतीसाठी आवश्यक असलेले ‘अवान’ म्हणजे बियाण्याच्या रोपांची निर्मिती पिढ्यान्पिढ्या करीत असत. पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्षे चालत आलेल्या या रोपवाटिकेतील निर्मिती ही प्रामुख्याने कांदे व मिरचीच्या अवानाची असायची.