शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

सुनील पावरा यांचा घातपात!

By admin | Updated: December 31, 2015 00:34 IST

ग्रामसेवक मृत्यू प्रकरण : कुटुंबीयांचा आरोप; वरिष्ठ अधिकाऱ्यांवर संशय

मालवण : देवगड तालुक्यातील साळशी-चाफेड येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले सुनील ठोबा पावरा (वय ३२) यांनी आत्महत्या केली नसून, त्यांचा घातपात करण्यात आल्याचा आरोप पावरा कुटुंबीयांनी केला आहे. पंचायत समिती स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासावरून हा प्रकार घडला. सुनील पावरा यांना ठार मारून आत्महत्या केली, असे भासविण्याचा प्रयत्न केला आहे. यामागे तो अधिकारीच जबाबदार आहे, असे सुनील पावरा यांचे वडील ठोबा पावरा यांनी सांगितले आहे. त्यामुळे ग्रामसेवक मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.दरम्यान, मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुनील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदनास पावरा कुटुंबीयांनी विरोध दर्शविला आहे. पुणे येथील प्रयोगशाळेत शवविच्छेदन व्हावे, अशी मागणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत पावरा कुटुंबीयांनी कायम धरली होती. साळशी-चाफेड येथून १ डिसेंबरपासून बेपत्ता असलेले ग्रामसेवक सुनील पावरा यांचा सडलेल्या स्थितीतील मृतदेह मंगळवारी सायंकाळी मालवण तालुक्यातील रेवंडी-मधलीवाडी येथील जंगलमय भागात गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला होता. मृतदेहाच्या पॅन्टच्या खिशामधून डायरी, काही रोख रक्कम, मोबाईल व चिठ्ठी सापडून आली होती. मालवण पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी मृतदेहाचे वर्णन व मृतदेहाशेजारी उभ्या स्थितीत असलेली मोटारसायकल यावरून सुनील पावरा याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली होती. (प्रतिनिधी)नातेवाइकांनी केली ‘त्या’ जागेची पाहणीसुनील पावरा यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक बुधवारी सकाळी मालवणमध्ये दाखल झाले. नातेवाइकांनी आपणास जेथे आत्महत्या केली होती ती जागा दाखविण्याची पोलीस प्रशासनास विनंती केली. त्यानंतर नातेवाइकांनी पोलिसांसमवेत दुपारी रेवंडी-मधलीवाडी येथील जंगलमय भागाची पाहणी केली. यात त्यांना तो परिसर संशयास्पद वाटला. आत्महत्या केलेल्या ठिकाणी उंदीर मारण्याचे औषध सापडले. तसेच त्यांचा चष्मा व्यवस्थित दुमडलेल्या स्थितीत होता. झाडावरही लटकलेल्या दोरीचे कोणतेही निशाण नव्हते. देशी दारूची बाटली, थंड पाण्याची बाटली व पाणी ओतलेले भांडे होते. त्यातील पाणीही स्वच्छ होते. यावरून अन्य ठिकाणी सुनील याला मारून त्याचा मृतदेह लटकविण्यात आला. त्यामुळे ही आत्महत्या नसून, घातपातच आहे. जर सुनील याने याठिकाणी आत्महत्या केली असती, तर पन्नास फुटांवर असलेल्या रस्त्यालगत दुर्गंधीचा वास स्थानिकांना आला असता. मात्र, तसा कोणताही प्रकार घडला नाही, असे सुनील यांचा भाऊ यांने सांगितले.पोलिसांनी दिलेली माहिती खोटी!पोलिसांनी सुनील पावरा यांच्या घरच्यांनी मनाविरुद्ध लग्न ठरविल्याच्या रागातून आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला होता. मात्र, सुनील यांचा लग्नाला विरोध नव्हताच. पोलिसांनी दिलेली माहिती खोटी आहे. घटनास्थळाचा अंदाज घेता ती आत्महत्या नसून, घातपात असल्याचा आरोप केला.चिठ्ठीत ‘आत्महत्ये’चाच उल्लेखपोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी सापडलेली चिठ्ठी बुधवारी सूर्यप्रकाशात धरून पाहिली असल्याचे सांगताना अस्पष्ट झालेल्या मजकुरात स्वत:हून आत्महत्या करीत आहोत, असा मजकूर आहे असे सांगितले. नातेवाइकांची रीतसर तक्रार याबाबची बेपत्ता नोंद ज्या देवगड पोलीस ठाण्यात आहे तेथे ते नोंदवतील. मालवण पोलीस ठाण्यात तक्रार कशी दाखल करणार असे सांगितले. एकूणच नातेवाइकांनी सायंकाळी वा उद्या तक्रार नोंदवू, असे सांगितले आहे.