शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील युवकांची सावंतवाडीत आत्महत्या

By admin | Updated: December 12, 2014 23:32 IST

कारण अस्पष्ट : दोघेही जवळचे मित्र

सावंतवाडी : गोव्यातील दोन युवक आज, शुक्रवारी येथील रामकृष्ण लॉजमध्ये मृतावस्थेत आढळून आले. दोघेही जवळचे मित्र असून गोव्यातील कळंगुट येथे विदेशी चलन देवाण-घेवाण व्यवसायात काम करत होते. यातील प्रदेश शंकर चोडणकर (वय ३३, रा. बेती, बार्देश, गोवा) याने गळफास लावून, तर नीलेश श्रीराम पार्सेकर (४१, रा. कामुर्ली, बार्देेश, गोवा) याने विष प्राशन केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, हे दोन्ही युवक बेपत्ता असल्याची नोंद म्हापसा पोलिसांकडे झालेली आहे.शहरातील रामकृष्ण लॉजमध्ये गुरुवारी सकाळी ९ वाजता प्रदेश व नीलेश हे दोन युवक राहण्यासाठी आले होते. त्यानंतर ते दिवसभर रूममधून बाहेर पडले नाहीत. शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रामकृष्ण लॉजचे मालक मसूरकर हेत्यांना उठविण्यासाठी रूमच्या दरवाजावर गेले. त्यावेळी आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दरवाजाच्या छिद्रातून आतमध्ये बघितले. त्यांना प्रदेश चोडणकर हा गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला.त्यामुळे मसूरकर हे घाबरले आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक रणजित देसाई व महेंद्र शेलार यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा उघडून पाहणी केली असता नीलेश पार्सेकर हाही मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेल्या माहिती पत्रकावरून त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. तसेच म्हापसा पोलिसांनाही माहिती दिली. त्यावेळी हे दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबाने केली असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेहाचे पंचनामे करून मृतदेहाची उत्तरीय तपासणीसाठी कुटिर रुग्णालयात पाठवले. या घटनेची माहिती मिळताच दोघा युवकांचे कुटुंब तसेच मित्रमंडळी सावंतवाडीत दाखल झाली. दोघा युवकांचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल सुभाष तेली करत आहेत. (प्रतिनिधी)