शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

सशक्त पिढीसाठी परीक्षा पध्दती आवश्यक

By admin | Updated: August 27, 2015 23:35 IST

शिक्षण हक्क कायदा : विद्यार्थ्यांची गुणवत्ता तरी वाढू द्या...!--लोकमत सर्वेक्षण

मेहरुन नाकाडे - रत्नागिरीशिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करता पुढील वर्गात प्रवेश देण्यात येतो. आठवीपर्यंत पुढच्या वर्गात विद्यार्थ्यांना पाठविले जात असल्यामुळे नववीच्या वर्गात पास होणे अवघड जाते. तसेच शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी शासनाने सर्व व्यवस्थापनाच्या मान्यताप्राप्त, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची अध्ययन संपादणूक पातळी तपासण्यासाठी राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे. एकूणच परीक्षा पध्दती आवश्यक की, अनावश्यक यावर शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. परंतु सर्वांच्या प्रतिक्रियेतून स्पर्धेच्या युगात सशक्त पिढी तयार करण्यासाठी परीक्षा पध्दती आवश्यक असल्याचे मत दिसून आले.पहिली ते आठवीपर्यंत जे विद्यार्थी नापास होतात, त्यांना त्याच वर्गात बसवण्याऐवजी पुढील वर्गात ढकलण्यात येते. त्यामुळे आठवीच्या वर्गात आल्यानंतर त्यांना आधीचं काही येत नाही. यावरून शिक्षणाचा दर्जा घसरलेला दिसून येत आहे. काही शाळांमधील तिसरीच्या, पाचवीच्या विद्यार्थ्यांना पहिलीचे पुस्तकही वाचता येत नाही. विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहिल्याने त्याचा परिणाम नववीच्या निकालावर होत आहे. ज्या शाळांच्या पहिली ते नववीपर्यंत प्रत्येकी दोन तुकड्या आहेत, त्या शाळांची दहावीची केवळ एकच तुकडी आहे. दहावीचा निकाल राखण्यासाठी काही शाळांनी शक्कल लढवून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश, तर तळ्यात-मळ्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांचे सतरा नंबरचे फॉर्म भरण्यात येतात. आठवीपर्यंत पासमुळे विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची सवय नष्ट झाली आहे. पालकांमध्येही शिथीलता आली आहे. विद्यार्थ्यांमधील स्पर्धात्मकवृत्ती कमी झाल्यामुळे परीक्षा पध्दती व अभ्यासाचे गांभीर्य राहिलेले नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होत असलेला दिसून येत आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन करण्यात येत असल्यामुळे अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांमधील क्रीडा, कला गुण हेरून त्यांना प्रोत्साहित करण्यात येते. अभ्यासाबरोबर इतर कलागुणांना वाव मिळून संबंधित विद्यार्थी कौतुकास पात्र ठरत आहेत. शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी परीक्षा पध्दत सुरू ठेवली असली तरी शासकीय निर्णयानुसार ग्रेड पध्दतीचा अवलंब करण्यात येतो. विशेष अध्यापन....एखाद्या विषयात नापास किंवा कमी गुण मिळाले आहेत, त्याबाबत खास विद्यार्थ्यांसाठी वर्गात जादा तास घेऊन त्यांच्यासाठी विशेष अध्यापन केले जात आहे. जेणेकरून संबंधित विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांबरोबर एका विशिष्ट पातळीवर येतील. त्यासाठी शिक्षक व मुख्याध्यापकांचे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत.