शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी दलालांना हाकला

By admin | Updated: May 29, 2015 00:01 IST

रामदास कदम : खारी देवणेत बांधकाम मंत्र्यांच्याहस्ते पुलाचे भूमिपूजन

खेड : कोकणात आंबा आणि काजू मोठ्या प्रमाणात पिकतो. मात्र, येथील व्यावसायिक आणि शेतकऱ्यांच्या या पिकांना संरक्षण मिळत नाही. पिकाला हमी मिळत नाही. इथल्या पिकांचा नफा दलालांच्या घशात जातो. त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रथम दलालीतून बाहेर काढणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले. कोकणातील आंबा आणि काजू बोर्डाला १00 कोटी रुपये देण्याची मागणीही कदम यांनी या बोर्डाचे प्रमुख आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. कोकणातील लोकांना संघर्षाशिवाय काही मिळत नसल्याची खंत यावेळी कदम यांनी व्यक्त केली.खेड तालुक्यातील खारी-देवणे येथील ८ कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे भूमिपूजन गुरुवारी सकाळी १0 वाजता सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पर्यावरणमंत्री रामदास कदम बोलत होते. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जगदीश राजापकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अरूणा आंबे्र, रमेश भागवत, संजय बुटाला अ‍ॅड. मिलिंद जाडकर, खेडचे सभापती चंद्रकांत कदम, भगवान घाडगे यांच्यासह असंख्य लोक उपस्थित होते.देवणे पुलाचा खाडीपट्टा, खेड व दापोली तालुक्यातील ४५ गावांना लाभ होणार आहे. रामदास कदम यांनी कोेकणातील समुद्रकिनारी लगतचे सीआरझेड कायदयामध्ये शिथीलता आणावी असे सांगत येथील पर्यटनासाठी आघाडी सरकारने राखुन ठेवलेले २२0 कोटी रूपये परत गेल्याने ती चूक सेना भाजपा सरकार करणार नसल्याचे स्पष्ट केले.देवणे पुलाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यानंतर बिरमणी हातलोट घाटाच्या आणि रस्त्याच्या ८ कोटी रूपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजनही पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या मार्गामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडले जाणार असल्याने या मार्गाला मोठे महत्व आले आहे. याकरीता पंकजा मुंडे यांनी २ कोटी २५ लाख रूपये दिले आहेत.बांधकाम मंत्र्यांनी पाडला पैशाचा पाऊसरत्नागिरी जिल्ह्याला यापुढे भरघोस मदत देण्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी रस्ते विकासासाठी निधी अपुरा असल्याचे सांगितल्यानंतर पाटील यांनी जिल्ह्याला रस्त्यांसाठी येत्या पुरवणी अधिवेशनात १0 ऐवजी ११ कोटी रूपये देण्याची घोषणा पाटील यांनी केली. वायकर यांनी जिल्ह्यातील साकव बांधकामास अपु-या निधीबाबत सुतोवाच केल्यानंतर पाटील यांनी २0 लाखाच्या ऐवजी आपण येत्या १0 दिवसात ३५ लाख रूपये देण्याचे जाहीर केले. साकव आणि रस्त्यांसाठी मिळून १६ कोटी रूपये जादा देण्याची घोषणा त्यांनी या कार्यक्रमात केली.